शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

Ram Mandir: काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण नाकारलं; 'खदखदणारा हिंदूद्वेष' म्हणत भाजपाची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 18:55 IST

ram mandir ayodhya photo: २२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे.

२२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. यावरून राजकारण देखील चांगलेच तापले असून, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले आहे. पक्षातर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही. 

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश आज एक पत्रक काढत म्हणाले की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि नेते अधीर रंजन चौधरी यांना २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते. प्रभू रामाची आपल्या देशात लाखो लोक पूजा करतात. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. पण राम मंदिराचे उद्घाटन भाजपा आणि आरएसएसच्या नेत्यांनी निवडणुकीच्या फायद्यासाठी पुढे आणले आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 

भाजपाची सडकून टीकाकाँग्रेसने निमंत्रणाला नकार देताच भाजपाने टीका केली. भाजपा महाराष्ट्र या सोशल मीडिया हँडलवरून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आले. भाजपाने पोस्टच्या माध्यमातून म्हटले, "जो राम का नही वो किसी काम का नही… आज काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण नाकारून पुन्हा एकदा त्यांच्या मनात खदखदणारा हिंदूद्वेष सिध्द केला. जनतेच्या मनातला राम यांना कधीच कळला नव्हता. विकासात त्यांना राम कधी गवसला नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली इंग्रजांचा 'तोडा आणि राज्य करा' हा मंत्र गेली ७ दशकं जपत आहेत. पण भारत बदलतोय. आमची शबनम शेख स्वतः रामललाच्या दर्शनासाठी मैलोमैल चालत आयोध्येत पोहचतेय. आणि तुम्ही अजूनही आमच्या देशाचं आराध्य असलेल्या श्रीरामांना स्वीकारण्याचं औदार्य दाखवू शकत नाही." 

दरम्यान, अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिर उभारणीचा देशभरात उत्साह असून भाविकांचे डोळे अयोध्येकडे लागले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ७ लाख भाविक अयोध्येत दाखल होणार आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, सेलिब्रिटीही सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. तर, संत, महात्मा आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी संघर्ष करणारे कारसेवकही या सोहळ्यासाठी अयोध्येत येत आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याcongressकाँग्रेसBJPभाजपाSonia Gandhiसोनिया गांधी