राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणा-या चौघांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: January 4, 2017 14:25 IST2017-01-04T14:25:57+5:302017-01-04T14:25:57+5:30

नाटकार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा संभाजी उद्यानामधील पुतळा हटवणा-या संभाजी ब्रिगेडच्या 4 कार्यकर्त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Ram Ganesh, all four persons who have been removing statues of Gadkari, are in police custody | राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणा-या चौघांना पोलीस कोठडी

राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणा-या चौघांना पोलीस कोठडी

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 4 - नाटकार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा संभाजी उद्यानामधील पुतळा हटवणा-या संभाजी ब्रिगेडच्या 4 कार्यकर्त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. संंबंधित प्रकरणाच्या अधिक तपासासाठी न्यायालयाने हा आदेश दिला आहे.  प्रदीप कणसे, हर्षवर्धन मगदूम, स्वप्निल काळे, गणेश कारले, अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
 
मंगळवारी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवून तो नदीपात्रात फेकून देणा-या चौघांना बुधवारी सकाळी 11 वाजता शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले.
 
पुतळा हटवण्यासाठी आरोपींनी वापरलेला हातोडा, कु-हाड अद्यापपर्यंत ताब्यात घेण्यात आलेले नाही. पुतळा कोठे टाकून दिला याचा शोध सध्या पोलीस करत आहे. याचाच शोध घेण्यासाठी सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली, व न्यायालयाने ती मंजूरही केली.  
 

Web Title: Ram Ganesh, all four persons who have been removing statues of Gadkari, are in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.