‘बच्चनवेडे कोल्हापूरकर’ आज काढणार रॅली
By Admin | Updated: February 6, 2015 00:54 IST2015-02-06T00:53:33+5:302015-02-06T00:54:43+5:30
त्यात आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह कोल्हापूर, सांगली तसेच राज्यासह कुवेत, दुबईतील वैद्यकीय, वकील, आदी बच्चनप्रेमींचा समावेश

‘बच्चनवेडे कोल्हापूरकर’ आज काढणार रॅली
कोल्हापूर : ‘व्हॉटस् अॅप’वरील बच्चनवेडे कोल्हापूरकर शुक्रवारी, सायंकाळी साडेपाच वाजता रॅली काढून अमिताभ बच्चन यांच्या ‘शमिताभ’ चित्रपटाचे स्वागत करणार आहेत. बच्चन यांच्या चाहते ‘बच्चन वेडे कोल्हापूरकर’ व्हॉटस् अॅप ग्रुपद्वारे एकवटलेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा ग्रुप सुरू झाला. बच्चन व त्यांच्या चित्रपटांद्वारे मनोरंजन करणे, असा या ग्रुपचा उद्देश आहे. त्यात आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह कोल्हापूर, सांगली तसेच राज्यासह कुवेत, दुबईतील वैद्यकीय, वकील, आदी बच्चनप्रेमींचा समावेश आहे.