‘दिवाळी भेट’साठी कामगार संघटनांची धावाधाव

By Admin | Updated: October 8, 2016 04:35 IST2016-10-08T04:35:17+5:302016-10-08T04:35:17+5:30

दिवाळी भेट म्हणून १५ हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून एसटी महामंडळाकडे करण्यात आली

Rally for the 'Diwali Gift' | ‘दिवाळी भेट’साठी कामगार संघटनांची धावाधाव

‘दिवाळी भेट’साठी कामगार संघटनांची धावाधाव


मुंबई : एसटी कामगारांना दिवाळी भेट म्हणून १५ हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त संघटनेकडून मागणी केलेली असतानाच अन्य एसटी संघटनांनीही यंदा दिवाळी भेटसाठी महामंडळाला साकडे घातले आहे. यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन महामंडळाकडून देण्यात आले.
गेल्या वर्षी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून १५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी महामंडळाने कर्मचाऱ्यांना २,५00 रुपये तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट देण्यात आली. यंदाही १५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिली. कामगारांना दिवाळी भेट देताना कोणताही भेदभाव करू नये, असेही ते म्हणाले.
ही मागणी केलेली असतानाच महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३0 दिवसांचा बोनस देण्यात येणार आहे.
पालिका कर्मचाऱ्यांनाही भरघोस दिवाळी भेट देण्यात येत असल्याने त्याच धर्तीवर एसटीने उत्पादकतेचा विचार न करता दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी केल्याचे सांगितले. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडूनही महागाई भत्ता व दिवाळी भेट देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे. दिवाळी सण आॅक्टोबर अखेरीस येत असल्याने महागाई भत्त्यातील उर्वरित ७५ टक्के रक्कम, कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात यावी. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी २,५00 रुपये दिवाळी भेट कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. या वर्षी दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात यावा, अशी
मागणी केल्याचे कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>दिवाळी भेट म्हणून मान्यताप्राप्त संघटनेने १५ हजार रुपये देण्याची मागणी केली आहे. तर अन्य काही संघटनांनीही वाढीव दिवाळी भेट देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. कामगारांना दिवाळी भेट देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- दिवाकर रावते,
परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष

Web Title: Rally for the 'Diwali Gift'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.