राखी सावंतच्या भावाला छेडछाडप्रकरणी अटक व सुटका

By Admin | Updated: January 9, 2016 10:53 IST2016-01-09T10:52:07+5:302016-01-09T10:53:33+5:30

टीव्ही मालिकेत काम करणा-या अभिनेत्रीची छेड काढल्याबद्दल प्रसिद्ध आयटम गर्ल व सिनेकलाकार राखी सावंत हिचा भाऊ राकेश सावंतला अटक करण्यात आली.

Rakhi Sawant's brother arrested and released for torture | राखी सावंतच्या भावाला छेडछाडप्रकरणी अटक व सुटका

राखी सावंतच्या भावाला छेडछाडप्रकरणी अटक व सुटका

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - टीव्ही मालिकेत काम करणा-या अभिनेत्रीची छेड काढल्याबद्दल प्रसिद्ध आयटम गर्ल व सिनेकलाकार राखी सावंत हिचा भाऊ राकेश सावंत याला मुंबई पोलिसांनी काल रात्री अटक केली. मात्र थोड्याच वेळात त्याची जामिनावर सुटकाही झाली. सुटकेनंतर राकेशने प्रसिद्धीमाध्यमांसमोर आपण निर्दोष असल्याचा दावा केला. 
झाँसी की रानी, मे लक्ष्मी तेरी आंगन की इत्याही मालिकांमध्ये काम करणारी एक अभिनेत्री तिच्या मित्रासोबत अंधेरीतील लोखंडवाल परिसरातील एका कॉफी शॉपमध्ये गप्पा मारत होते. त्याचवेळी शेजारच्या टेबलवर बसलेल्या राकेश सावंतने ती अभिनेत्री व कॉफी शॉपमधील अन्य एका महिलेकडे पाहून आक्षेपार्ह भाषेत कॉमेंट्स केल्या. तसेच त्याने त्या अभिनेत्रीचे फोटो काढण्याचेही प्रयत्ने केले. हे पाहून त्या अभिनेत्रीच्या मित्राने पोलिसांना फोन केला असता पोलिसांनी कॉफी शॉपमध्ये येऊन राकेशला अटक केली. मात्र थोड्याच वेळात त्याची जामिनावर सुटका झाली. याप्रकरणाची चौकशी सुरू असून कॉफी शॉपमधील सीसीटीव्ही फूटेज तपासणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

Web Title: Rakhi Sawant's brother arrested and released for torture