राखी सावंत जामिनासाठी उच्च न्यायालयात
By Admin | Updated: April 8, 2017 05:17 IST2017-04-08T05:17:21+5:302017-04-08T05:17:21+5:30
लुधियाना न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटविरुद्ध अभिनेत्री राखी सावंत हिने उच्च न्यायालयाने ट्रान्झिट जामिनासाठी याचिका दाखल केली

राखी सावंत जामिनासाठी उच्च न्यायालयात
मुंबई : लुधियाना न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटविरुद्ध अभिनेत्री राखी सावंत हिने उच्च न्यायालयाने ट्रान्झिट जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने याचिकेवरील निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे.
एका वकिलाने राखी सावंतविरुद्ध न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर न्यायालयाने राखी सावंतला उपस्थित राहाण्यासाठी अनेक नोटिशी पाठवल्या. मात्र, तरीही ती उपस्थित न राहिल्याने, लुधियाना न्यायालयाने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले. त्यामुळे राखी सावंतने ट्रान्झिट जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. अजय गडकरी यांच्याकडे या याचिकेवर सुनावणी होती. याचिकेनुसार, लुधियाना न्यायालयाने सर्व नोटीस जुन्या पत्त्यावर पाठवल्या. त्यामुळे त्या तिला मिळाल्याच नाहीत आणि कोणी कळवलेही नाही.
लुधियाना न्यायालयात हजर राहाण्यासाठी आधी ट्रान्झिट जामीन मंजूर करावा, अशी विनंती राखी सावंतने याचिकेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)