राकेश मारियांना कोर्टाचा दिलासा

By Admin | Updated: June 21, 2015 01:37 IST2015-06-21T01:37:44+5:302015-06-21T01:37:44+5:30

पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी संपूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी या मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशाला

Rakesh Maria's court relief | राकेश मारियांना कोर्टाचा दिलासा

राकेश मारियांना कोर्टाचा दिलासा

मुंबई : पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी संपूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी या मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्या. अनुप मोहता यांच्या खंडपीठाने ही स्थगिती दिली असून यावर अंतिम सुनावणी येत्या जुलै महिन्यात होणार आहे.
मुंबई हल्ल्यात शहिद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता यांनी माहितीच्या अधिकाराखाली काही माहिती पोलीस दलाकडून मागितली होती़ सुरुवातीला त्यांना ही माहिती नाकारण्यात आली़ नंतर ही माहिती देण्यात आली़ पण या माहितीत काही तफावत असल्याचा ठपका ठेवत विनिता यांनी आयुक्तांकडे तक्रार केली़
त्याची दखल घेत गेल्या वर्षी माहिती आयुक्तांनी निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले़ त्या विरोधात मारिया यांनी मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे़ माहिती आयुक्त हे न्यायालयीन चौकशीचे आदेश देऊ शकत नाही़ चौकशीचे आदेश देणे हे माहिती आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही़ तेव्हा न्यायालयीन चौकशीचे माहिती आयुक्तांचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी अ‍ॅड़ वग्यानी यांनी केली़
ती ग्राह्य धरत न्यायालयाने माहिती आयुक्तांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली.

Web Title: Rakesh Maria's court relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.