शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Rajyasabha Election Maharashtra: चर्चांना उधाण! मविआचे नेते फडणवीसांच्या भेटीला; दुसरीकडे घोडेबाजारावरून संजय राऊतांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 11:02 IST

काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांचे पलायन पुन्हा सुरु झाले असून याला जबाबदार कोण यांचा पर्दाफाश काश्मीर फाईल्स-२ काढून करावा, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

राज्य सभेच्या सहाव्या जागेवरून रस्सीखेच सुरु झालेली असताना महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधान आले आहे. शिवसेनेचे खासदार, राष्ट्रवादीचे मंत्री आणि काँग्रेसचे मंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी गेल्याने नेमकी कशावरून चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. याचवेळी नेमके संजय राऊतांनी निवडणुकीमध्ये घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप केला आहे. 

राज्यसभेच्या सहा जागा आणि सात उमेदवार उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीकडे आणि भाजपाकडे जादाची मते आहेत. अपक्षांची मते देखील आहेत. परंतू असे जरी असले तरी भाजपाला महाविकास आघाडीची मते घेतल्याशिवाय किंवा आघाडीला भाजपाची मते घेतल्याशिवाय सहावा उमेदवार निवडून आणणे कठीण आहे. दोन्ही बाजुने आमच्या मतांची बेगमी झाल्याचे दावे केले जात आहेत. परंतू, आजच्या बैठकीवरून कोणाच्याच हाती काही नसल्याचे दिसत आहे. अशावेळी राऊतांनी भाजपाचे नाव न घेता घोडेबाजाराचा आरोप केला आहे. 

काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांचे पलायन पुन्हा सुरु झाले असून याला जबाबदार कोण यांचा पर्दाफाश काश्मीर फाईल्स-२ काढून करावा, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. याचबरोबर राज्यसभा निवडणुकीसाठी आमदार खरेदी करण्यात येत आहेत. हे सर्वात मोठे मनी लाँड्रींग आहे, ईडीने याकडे लक्ष द्यावे असा आरोप राऊत यांनी केला. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार, शिवसेना खासदार अनिल देसाई हे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले आहेत. 

सरसंघचालकांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो असे म्हणत राऊतांनी महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले असल्याचे राऊत म्हणाले. राज्यात घोडेबाजार सुरु आहे. हा पैसा कुठून येतो? तो कुठे जातो यावर केंद्रीय यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील आधीच बिघडलेले वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे. प्रचंड घोडेबाजार सुरु झाला आहे, असे राऊत म्हणाले. मी काही दिवसांपासून कोटी, कोटींमध्ये आकडे ऐकत आहे. ही सर्वात मोठी पैशांची अफरातफर आहे. हा घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ गेले असल्याचे राऊत म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतRajya Sabhaराज्यसभा