शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

Rajya Sabha Election: महाविकास आघाडीला अपक्षांचं बळ, ट्रायडंटमधील शक्तिप्रदर्शनात एवढ्या अपक्ष आमदारांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 20:26 IST

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीपूर्वी आपलं संख्याबळ भक्कम करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये तब्बल ११ अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावली आहे.

मुंबई - राज्यसभा निवडणुकीपूर्वी आपलं संख्याबळ भक्कम करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये तब्बल ११ अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावल्याने निवडणुकीला काही दिवस उरले असताना महाविकास आघाडीचं पारडं चांगलंच जड झालं आहे. तर भाजपाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपाचे दोन, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येणार आहे. मात्र शिवसेनेने दुसरा तर भाजपाने आपला तिसरा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. तसेच भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. तर आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन केले आहे. तसेच या बैठकीत निवडणुकीसाठी खास रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ट्रायडंटमध्ये आयोजित या बैळकीला एकूण ११ अपक्ष आमदार उपस्थित राहिले आहेत. त्यामध्ये किशोर जोरगेवार, देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे, गीता जैन, मंजुळा गावित, आशिष जयस्वाल यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडे त्यांच्या कोट्यातील उमेदवारांना मतदान केल्यानंतर एकूण २६ मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला १६ मतांची गरज आहे. आता ११ अपक्ष आमदारांनी उपस्थित राहून पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचे पारडे काहीसे जड झाले आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेना