शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

अपक्ष, छोट्या पक्षाच्या आमदारांचा भाव वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:55 IST

या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पडला तर त्याचे पडसाद राज्यातील सरकारवर पडू शकतात.

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुणीही माघार न घेतल्याने अखेर १० जूनला निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे २ तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ आणि भाजपाकडून ३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत मविआ उमेदवाराचा पराभव करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. या निवडणुकीनंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक येत असल्याने सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

या निवडणुकीची मदार आता अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांच्यावर अवलंबून आहे. यात समाजवादीचे २, प्रहार पक्षाचे २, स्वाभिमानी १, बहुजन विकास आघाडी ३, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १ तर मनसे १ या आमदारांच्या मतांकडे सगळ्यांचे लक्ष असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मत द्यायचं असल्याने पक्षाची मते फुटण्याची शक्यता फार कमी आहे. त्यातच जर कुणी नाराज आमदाराने पक्षाच्या विरोधात जात मत देण्याचं धाडस केले तर त्या आमदाराला कायदेशीर पाठबळ देण्याची तयारी भाजपाची आहे असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानं मते फुटणार का? हे १० तारखेला समोर येणार आहे. 

या निवडणुकीत भाजपानं ३० मते असल्याचा दावा केला असून त्यांना तिसऱ्या उमेदवारासाठी १२ मतांची गरज पडणार आहे. तर शिवसेनेकडेही पुरेसे मतं नाहीत. त्यामुळे अपक्ष आणि इतर छोट्या पक्षाच्या मतांवर सहाव्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येणं त्यांच्यासाठी गरजेचे आहे. कारण त्यावर सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. भाजपाचं गणित एकूण आमदार १०६समर्थक अपक्ष आमदार ४सहकारी आमदार ३ एकूण ११३ आमदार भाजपाचे सहकारी पक्ष - शेकाप, रासप आणि जनसुराज्य प्रत्येकी १

मुदत संपली! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली; शिवसेना-भाजपात थेट लढत

अधांतरी पक्ष - मनसे १, माकप - १ आणि एमआयएम २ 

महाविकास आघाडीचं संख्याबळशिवसेना- ५५(जास्त मते १३) राष्ट्रवादी ५३(जास्त मते ११)काँग्रेस ४४(जास्त मते २)एकूण १५२(जास्त मते २६)

वर्षावर या! अपक्ष आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण; तीन दिवस सुरक्षित स्थळी पाठविणार

महाविकास आघाडी समर्थक पक्ष - प्रहार २, समाजवादी-२, स्वाभिमानी १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, बहुजन विकास आघाडी ३ अशी मतं आहेत.  या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पडला तर त्याचे पडसाद राज्यातील सरकारवर पडू शकतात. मविआकडे संख्याबळ कमी आहे हे जर भाजपाला कळालं तर त्याचा धोका महाविकास आघाडी सरकारला होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतल्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली होती. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत कुणाचं पारड जड आहे हे भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळणार आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा