शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

RajyaSabha Election Maharashtra: अखेर फडणवीसांनी फासे टाकलेच! मविआला शब्द दिला, पण...; भाजप नेत्यांची बैठक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:30 IST

महाविकास आघाडीचे नेते निघून गेल्यावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यानंतर पोहोचलेले माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात बैठक सुरु आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोण माघार घेणार की मतदानाची चुरस रंगणार याचे चित्र दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होईल. उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशावेळी मविआचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. यावेळी बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या फडणवीसांनीच मविआसमोर आपले फासे टाकत चेंडू ठाकरे सरकारच्या कोर्टात टोलविला आहे. 

RajyaSabha Election Maharashtra: मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले

महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...

राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार, शिवसेना खासदार अनिल देसाई हे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले होते. या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. ही चर्चा भुजबळ यांनी सकारात्मक झाल्याचा दावा केला आहे. 

मविआची ऑफर नेमकी काय? राज्यसभेची निवडणूक आम्हाला बिनविरोध करायची आहे, यामुळे भाजपाने राज्यसभेची उमेदवारी मागे घ्यावी, विधानपरिषदेला आम्ही जादाच्या जागा तुम्हाला देऊ, असा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांसमोर ठेवला. परंतू यात माहीर असलेल्या फडणवीसांनी राज्यसभेला तुमचा उमेदवार मागे घ्या आम्हीच तुम्हाला विधानपरिषदेत जागा सोडू, असा उलट प्रस्ताव दिला आहे. 

महाविकास आघाडीचे नेते निघून गेल्यावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यानंतर पोहोचलेले माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात बैठक सुरु आहे. मविआच्या प्रस्तावावर विचार करायचा की आपला उमेदवार तसाच ठेवायचा यावर या बैठकीत चर्चा सुरु झाली आहे. यातच मविआच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन फडणवीस यांना जाण्याची शक्यता आहे. 

शिवसेना अडकित्यात अडकली...काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यातच राज्यसभेची जागा शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपाने शिवसेनेला यावरून खिंडीत अडवण्यासाठी आपलाही उमेदवार दिला आहे. त्यातच काँग्रेसने राज्याबाहेरील उमेदवार दिल्याने मोठा पेच झाला आहे. काँग्रेसला आपल्याच आमदारांची मते पडतील की नाही याची शाश्वती नाहीय. यामुळे शिवसेनेला उमेदवार माघारी घेण्यास भाग पाडायचे, एवढा एकच पर्याय काँग्रेस नेत्यांना दिसत आहे. दुसरीकडे भाजपा वरचढ ठरेल याची चिंता शिवसेनेला आहे. महापालिका निवडणुकीआधीच राज्यातील सत्ता गमविणे शिवसेनेला परवडणारे नाही. तसेच पालिकांमध्ये तीन पक्ष एकत्र लढले तर फायदा होईल, ते देखील नुकसान झाले तर परवडणार नाही. यामुळे राज्यसभेतून माघार घेणेच शिवसेनेला सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार योग्य ठरेल.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRajya Sabhaराज्यसभाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस