पाटील खून खटल्यात राजू सोनवणो दोषी
By Admin | Updated: November 15, 2014 01:53 IST2014-11-15T01:53:43+5:302014-11-15T01:53:43+5:30
काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील यांच्या खून प्रकरणी मुख्य आरोपी राजू सोनवणो व राजू माळी (मयत) यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

पाटील खून खटल्यात राजू सोनवणो दोषी
जळगाव : काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील यांच्या खून प्रकरणी मुख्य आरोपी राजू सोनवणो व राजू माळी (मयत) यांना दोषी ठरविण्यात आले आहे. दोघांनी कटकारस्थान करून खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याचा निर्णय न्या. डी.जे. शेगोकार यांनी शुक्रवारी दिला. तर राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या इतर आरोपींवर खटला चालविण्याबाबत शनिवारी निर्णय होणार आहे.
आरोपी राजू सोनवणोच्या शिक्षेबाबत शनिवारी निर्णय होईल. प्रा. पाटील यांचा 21 सप्टेंबर 2क्क्5 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मानराज पार्कजवळ दोघा अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी धारदार शस्त्रंनी अमानुषपणो खून केला होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 46 साक्षीदार, प्रा. पाटील यांच्या पत्नी फिर्यादी रजनी पाटील यांच्यातर्फे श्रीधर चौधरी व महेंद्र महाजन तर बचाव पक्षातर्फे सुनील खाडे यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यात रामभाऊ पवार, महेंद्र महाजन यांच्यासह अन्य साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. मुख्य आरोपी राजू माळी व राजू सोनवणो यांच्यात व प्रा. व्ही.जी. पाटील यांच्यात कोणतेही वैर नव्हते. तसेच हा खून अचानक झालेल्या भांडणातून झालेला नव्हता. दोघांनी प्रा. पाटील यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कट रचला. प्रा. पाटील यांनी ठार मारण्यासाठी नेत्रदीप प्रोव्हीजनजवळ ते त्यांची वाट पाहत होते. आपली ओळख पटू नये यासाठी दोघांनी हेल्मेट घातल्याचे साक्षीमधून सिद्ध झाले आहे. त्यामुळे दोघांविरुद्ध कट रचणो, खून करणो असे आरोप सिद्ध झाल्याने राजू सोनवणोला दोषी ठरविण्यात येत असल्याचे न्या. शेगोकार यांनी सांगितले. आरोपी राजू माळीचा खटला सुरूअसताना मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)
च्फिर्यादी रजनी पाटील यांनी प्रा. पाटील खून प्रकरणात लीलाधर नारखेडे, दामोदर लोखंडे, डॉ. उल्हास पाटील व डॉ. जी.एन. पाटील यांना आरोपी करण्याची मागणी केली.
च्नारखेडे व लोखंडे यांनी त्यांच्याविरुद्धचा खटला रद्द व्हावा यासाठी दाखल केलेला अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच डॉ. उल्हास पाटील व डॉ. जी.एन. पाटील यांना सहआरोपी करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.