राजू शेट्टींचे ‘वर्षा’वर लोटांगण

By Admin | Updated: May 12, 2015 01:21 IST2015-05-12T01:21:49+5:302015-05-12T01:21:49+5:30

भाजपाची मस्ती उतरवू, असे चार दिवसांपूर्वी म्हणणारे खासदार राजू शेट्टी मंत्रिपद व महामंडळाच्या तुकड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर

Raju Shetti's 'Rain' on Lot | राजू शेट्टींचे ‘वर्षा’वर लोटांगण

राजू शेट्टींचे ‘वर्षा’वर लोटांगण

कोल्हापूर : भाजपाची मस्ती उतरवू, असे चार दिवसांपूर्वी म्हणणारे खासदार राजू शेट्टी मंत्रिपद व महामंडळाच्या तुकड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर लोटांगण घातल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा गौरव करणारा मी कार्यकर्ता होतो पण आमचे राजू शेट्टीसाहेब असे का वागू लागले, त्यांना एकदम शेतकऱ्यांचा विसर कसा पडला, याबद्दल धक्का बसल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.
येथे पत्रकार परिषदे बोलताना मुश्रीफ म्हणाले, सांगलीत साखर परिषद घेऊन ‘भाजपाची मस्ती उतरवू, दोन दिवसांत पालकमंत्र्यांना घेराव घालू’, अशा वल्गना राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी केल्या; पण दोन दिवसाच्या आतच मंत्रिपद व महामंडळाच्या तुकड्यांसाठी ‘वर्षा’वर लोटांगण घातले. दुसरीकडे, शरद पवार यांच्याकडील कृषीखाते जाऊन वर्ष झाले तरी त्यांच्यावर टीका करत आहेत. ते काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही, पालकमंत्र्यांच्या गाड्या अडवणारे ‘वर्षा’वर गुडघे टेकत का गेले, असा सवाल त्यांनी केला.
आता शेतकऱ्यांना वालीच कोणी राहिलेला नाही, आम्हालाच आंदोलन हातात घ्यावे लागणार आहे. दोन दिवसांत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, तरीही त्यांनी पॅकेज दिले नाहीतर त्यांना घेराव घालू, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Raju Shetti's 'Rain' on Lot