राजपूतच्या घरात १६ लाखांची रोकड
By Admin | Updated: January 30, 2015 04:03 IST2015-01-30T04:03:09+5:302015-01-30T04:03:09+5:30
भेसळविरुद्ध कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या वागळे इस्टेट युनिट ५-चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव

राजपूतच्या घरात १६ लाखांची रोकड
ठाणे : भेसळविरुद्ध कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या वागळे इस्टेट युनिट ५-चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांच्यासह पोलीस हवालदार प्रेमसिंग राजपूत, उदय कोरे, सुरेश पाटील यांना गुरुवारी ठाणे न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
तर चौकशी अंतर्गत राजपूत याच्या राहत्या घरात साडेसोळा लाखांची रोकड सापडली. त्याच्या नावे ठाण्यात तीन फ्लॅट आणि एक दुकान आहे. तसेच त्याच्या भावाच्या नावे आलिशान गाडी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना लाचलुचतप विभागाने बुधवारी अटक केली होती़ याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)