शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रजनीश सेठ, फणसाळकरच कायम राहणार; पोलीस नेतृत्व बदलाचा सरकारचा तूर्त विचार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 10:28 IST

सेठ आणि फणसाळकर यांना लगेच बदलणार का, या पत्रकारांच्या प्रश्नात फडणवीस यांनी थेट उत्तर दिले नाही. त्यांचे काम ठीक चालले आहे. फणसाळकर तर आता नवीनच आले आहेत ना, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.  

मुंबई : राज्य पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या जागी नवीन चेहरे आणण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना याबाबतचे संकेत दिले. सेठ आणि फणसाळकर यांना लगेच बदलणार का, या पत्रकारांच्या प्रश्नात फडणवीस यांनी थेट उत्तर दिले नाही. त्यांचे काम ठीक चालले आहे. फणसाळकर तर आता नवीनच आले आहेत ना, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.  दोघांचीही नियुक्ती ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. त्यामुळे शिंदे - फडणवीस सरकार येताच दोघांनाही बदलले जाईल, अशी चर्चा सुरू झाली. त्यातच सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने क्लीन चिट दिल्यानंतर त्या राज्यात परतणार असल्याच्या चर्चेला वेग आला. त्या पोलीस महासंचालक वा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून येऊ शकतात, असे तर्कही दिले गेले.  नवीन सरकारच्या त्या विश्वासातील मानल्या जातात. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आकसाने कारवाई करण्यात आल्याची भूमिका फडणवीस यांनी आधीपासूनच घेतली आहे.

 रश्मी शुक्ला यांचे महासंचालक म्हणून केंद्रात एम्पॅनेलमेंट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्या स्वत:ही इच्छुक असल्याचे समजते. जून २०२४मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. त्यामुळे राज्यात लगेच परत येण्याची त्यांची इच्छा नसल्याचे म्हटले जाते. एम्पॅनेलमेंटपूर्वीच शुक्ला यांना राज्यात पाठविण्याची भूमिका मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मांडली तर मात्र त्या राज्यात परतू शकतील. 

 सेठ यांची नियुक्ती आधीच्या सरकारने केली असली तरी त्यांच्याबाबत शिंदे - फडणवीस यांचा कोणताही आक्षेप वा विरोध नसल्याचे सांगण्यात येते. सेठ हे डिसेंबर २०२३मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नवीन चेहरा आणण्याचा विचार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होऊ शकतो, असे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस