नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेत राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.राष्ट्रपतिपदासाठी विरोधकांचा उमेदवार ठरविण्यासाठी दिल्लीत पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हजेरी लावली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली. २०१७ मध्ये झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएतील एक प्रमुख घटक पक्ष होता.
राजनाथ सिंह- उद्धव ठाकरे यांच्यात राष्ट्रपतींच्या नावाबाबत चर्चा झाली? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 08:06 IST