शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Rajesh Tope: 'तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल', राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 16:21 IST

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निर्बंधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी ओमायक्रॉनच्या धोक्याबाबतही सतर्क राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

मुंबई-

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निर्बंधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी ओमायक्रॉनच्या धोक्याबाबतही सतर्क राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसोबतच ओमायक्रॉनच्या धोक्यामुळेच सरकारनं खबरदारी म्हणून काही निर्बंध लागू केले आहेत. त्याचं नागरिकांना पालन करावं असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. यावेळी त्यांनी ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धोका किती गंभीर आहे याचीही माहिती दिली. 

राज्यात निर्बंध लागू केले असले तरी त्याचा कोणताही चुकीचा अर्थ कुणी काढू नये. मुख्यत: सध्या लग्नसराई सुरू झाली आहे, ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताचा काळ आहे यात लोकांची गर्दी होऊ नये त्यामुळेच निर्बंध लागू केले आहेत. तसंच ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्यानं त्याकडेही लक्ष देणं गरजेचं झालं आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला या निर्बंधांमागचं प्रमुख कारण म्हणजे जगात जर आपण पाहिलं तर युरोप, अमेरिका आणि फ्रान्समध्ये ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती एका दिवसात दुप्पट होऊ शकते इतकी आहे हे दिसून आलं आहे. गती आहे पण त्याबाबत भीती बाळगण्याची गरज नाही. कारण मृत्यूदर अधिक नाहीय. असं असलं तरी काळजी घेणं गरजेचं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की नववर्षाचं स्वागत नक्की सर्वांनी करावं, पण नियम पाळून वागावं, असंही राजेश टोपे म्हणाले. 

लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेलओमायक्रॉनच्या संसर्गाची गती जर दुप्पट आहे. तर याचा अर्थ लक्षात घ्या की आपल्याकडे सध्या जो ६०० ते ७०० चा आकडा होता तो आता १४०० पर्यंत वाढत आहे. त्यात ओमायक्रॉनचे राज्यातील रुग्णही १०० च्या घरात गेले आहेत. संसर्गाची गती वाढत गेली तर आता तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉनचीच असेल अशी शक्यता आहे, असं राजेश टोपे म्हणाले. 

ऑक्सिजनच्या अनुशंगानं लॉकडाऊन करणारज्यादिवशी राज्याला ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे म्हणाले. पण कोरोना संसर्गाची गती तर अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्र्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनांवर आणावी लागेल, असंही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. 

 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस