राजेंद्र दर्डा लोकमतच्या एडिटर इन चिफपदी
By Admin | Updated: November 16, 2014 02:20 IST2014-11-16T02:20:02+5:302014-11-16T02:20:02+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटर इन चिफपदी राजेंद्र दर्डा यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लोकमत समूहाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी शनिवारी औरंगाबाद येथे केली.

राजेंद्र दर्डा लोकमतच्या एडिटर इन चिफपदी
मुंबई : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटर इन चिफपदी राजेंद्र दर्डा यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लोकमत समूहाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी शनिवारी औरंगाबाद येथे केली.
देशभरात मराठी ‘लोकमत’च्या 11 आवृत्त्या, लोकमत समाचारच्या 6, तर लोकमत टाइम्सच्या 3 आवृत्त्या निघतात. तसेच आंतरराष्ट्रीय लाइफ स्टाइलवरील जी-2, दीपोत्सव व दीपोभव हे वार्षिक अंक लोकमत समूहातर्फे प्रकाशित होतात, तर ‘आयबीएन लोकमत’च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक जगातही ‘लोकमत’ने प्रवेश केला आहे.
शनिवारी औरंगाबादेत देशभरातून आलेल्या ‘लोकमत’च्या संपादकांच्या विशेष बैठकीत बोलताना खा. दर्डा म्हणाले, राजेंद्र दर्डा यांना पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘लोकमत’चे मुख्य संपादक म्हणून त्यांनी याआधी काम पाहिले होते. शिवाय नागपूर वृत्तपत्र विद्याविभागाच्या विद्याथ्र्याना पत्रकारितेचे धडे दिले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींसोबत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युगोस्लाव्हियाचा तर अटलबिहारी वाजपेयींसोबत त्रिनिदाद, टोबॅगो, जमैका, मोरोक्को या देशांचा दौराही केला.
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासोबत त्यांनी ब्राझील, चिली, मॅक्सिको, दक्षिण आफ्रिका या देशांचाही दौरा केला. लातूरच्या भूकंपात आणि कारगिल युद्धात ‘लोकमत’च्या वतीने त्यांनी मोठी मदत उभी केली होती. भारताचे विविध पंतप्रधान व राष्ट्रपतींसोबत पत्रकार म्हणून त्यांनी जगभराचा दौरा केला. 1988 साली अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीचे वृत्तांकनदेखील त्यांनी केले होते. आता पुन्हा ते या पदाच्या माध्यमातून ‘लोकमत’ची धुरा सांभाळतील, असेही खा. दर्डा यांनी जाहीर केले.
परदेश दौ:यावर आधारित ‘झुंबर’ हे मराठी आणि ‘व्हायब्रंट विग्नेट’ हे इंग्रजीतील प्रवास वर्णनदेखील त्यांनी लिहिले आहे. त्यांनी वर्तमानपत्रतून विविध विषयांवरही लिखाण केले आहे. 1999 ते 2क्14 या काळात त्यांनी महाराष्ट्र शासनात गृह, वित्त व नियोजन, ऊर्जा, पर्यटन, उद्योग, शालेय शिक्षण अशा विविध विभागांची मंत्रिपदे भूषविली आहेत. या अनुभवाचा मोठा फायदा ‘लोकमत’ला होईल, असा उल्लेखही खा. विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात केला.
यापुढे खा. विजय दर्डा हे ‘लोकमत’ समूहाचे चेअरमन व एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. याप्रसंगी एडिटोरियल बोर्डाचे डायरेक्टर ऋषी दर्डा व मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी त्यांचे स्वागत केले. हे वृत्त न्यूझीलंड दौ:यावर असलेल्या समूह संपादक दिनकर रायकर यांना दूरध्वनीवरून सांगण्यात आले तेव्हा त्यांनीही राजेंद्र दर्डा यांचे स्वागत केले व राजेंद्र दर्डा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आणखी जोमाने कामाला लागू, असे सांगितले. राजेंद्र दर्डा यांनी ‘लोकमत’च्या सर्व संपादकांसमक्ष हा पदभार शनिवारी स्वीकारला.