विजयी मालिका कायम राखण्यास राजस्थान सज्ज

By Admin | Updated: May 8, 2014 01:02 IST2014-05-08T01:02:35+5:302014-05-08T01:02:35+5:30

विजयाच्या ट्रॅकवर असलेल्या राजस्थान रॉयल्स गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध हिच मालिका कायम राखण्यास उत्सुक असेल.

Rajasthan to maintain the winning series | विजयी मालिका कायम राखण्यास राजस्थान सज्ज

विजयी मालिका कायम राखण्यास राजस्थान सज्ज

अहमदाबाद : विजयाच्या ट्रॅकवर असलेल्या राजस्थान रॉयल्स गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध हिच मालिका कायम राखण्यास उत्सुक असेल. या लढतीत विजय मिळवल्यास राजस्थान सलग पाच विजयांचा विक्रम साधेल. आयपीएलच्या सातव्या सत्रात राजस्थानची आत्तापर्यंतची कामगिरी समाधानकारक झाली आहे. शेन वॉटसनच्या नेतृत्वाखाली संघाने सातपैकी पाच लढतीत विजय साजरा केला आहे. १० गुणांसह ते तिसर्‍या स्थानावर विराजमान आहेत, तर दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या हैदराबादला चढ-उतार पाहावे लागलेत. हैदराबादने आत्तापर्यंत सहापैकी केवळ दोनच विजय मिळवले असून, ते सातव्या क्रमांकावर आहेत. संघाले गत लढतीत रॉयल चॅलेंजर बँगलोरकडून पराभव पत्करला होता. स्पर्धेतील इतर संघाच्या तुलनेत हैदराबादची गोलंदाजी ही मजबूत मानली जात आहे, परंतु गेल्या काही लढतीत त्यांना समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेनने बँगलोरविरुद्धच्या लढतीत अधिक निराश केले. स्टेनने या लढतीत चार षटकांत ३९ धावा दिल्या. हैदराबादने स्पर्धेत यापूर्वी राजस्थानकडून पराभव पत्करला आणि याच मानसिकतेत संघ मैदानात उतरल्यास त्यांचा पराभव अटळ आहे. स्टेन व्यतिरिक्त अष्टपैलू डॅरेन सॅमी याने फलंदाजीबरोबर गोलंदाजीत समाधानकारक कामगिरी केली आहे. आणि करण शर्माने गत लढतीत गोलंदाजीने प्रभावित केले. त्याने चार षटकांत १७ धावा देत तीन विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारनेही १६ धावांत दोन विकेट घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली. मात्र, इशांत शर्माला सातत्य राखण्यात अपयश आले आहे. फलंदाजीचा विचार केल्यास शिखर धवनलाही साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अ‍ॅरॉन फिंच, डेविड वॉर्नर, लोकेश राहुल हे काही प्रमाणात धावा करण्यात यशस्वी ठरलेत. या सर्व बाबतीत राजस्थान हैदराबादच्या वरचढ आहे, परंतु टी-२०मध्ये कधीही कोणताही संघ भारी पडू शकतो. राजस्थानने गत लढतीत रोमहर्षक विजय साजरा केला होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या त्या लढतीत शेन वॉटसन आणि प्रवीण तांबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. (वृत्तसंस्था)

तांबेच्या उपस्थितीत राजस्थानची गोलंदाजी आणखीन बहरली आहे. त्याला वॉटसनचीही तोलामोलाची साथ लाभत आहे. टीम साऊदी आणि रजत भाटिया यांना फार प्रभाव पाडता आला नाही. फलंदाजीत त्यांच्याकडे अजिंक्य रहाणे, करुण नायर, संजू सॅमसन, वॉटसन आणि स्टिवन स्मिथ ही मजबूत फौज आहे.

Web Title: Rajasthan to maintain the winning series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.