राजापूरची गंगामाई अवतरली
By Admin | Updated: May 8, 2017 04:36 IST2017-05-08T04:36:10+5:302017-05-08T04:36:10+5:30
उन्हाळे तीर्थक्षेत्री येथे रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गंगामाईचे अचानकपणे आगमन झाले. तब्बल १७१ दिवसांनी आगमन

राजापूरची गंगामाई अवतरली
लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर (जि. रत्नागिरी) : उन्हाळे तीर्थक्षेत्री येथे रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गंगामाईचे अचानकपणे आगमन झाले. तब्बल १७१ दिवसांनी आगमन झालेली गंगामाई मूळगंगा, गायमुख आणि चौदाही कुंडांमध्ये दमदारपणे प्रवाहित आहे.
राहुल काळे हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी गंगास्थानी गेले होते. गंगामाईचे आगमन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही माहिती त्यांनी गंगा देवस्थानचे पदाधिकारी श्रीकांत घुगरे यांना दिली.
उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबईकर कुटुंबीयांसमवेत सध्या कोकणात आले आहेत. गंगामाईच्या पवित्र स्रानाची पर्वणी त्यांना साधता येईल.