शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 21:55 IST

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

मंबई- आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये गुढा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. पाठिंबा देताना त्यांनी कुठलीही अट ठेवली नाही. आज देशात नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणावर विकास करत आहेत. मोदींच्या नेतृत्वासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, राज ठाकरेंनी विधानसभेची तयारी करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले. यावर शिंदे म्हणाले, राज ठाकरे यांचा एक पक्ष आहे. प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.

फक्त मोदींसाठी! राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेबाबतही सूचक घोषणा

पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात अनेक सभा होणार आहेत. त्याचे महाराष्ट्र वर प्रेम आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून येतील अशी गॅरंटी मतदारांनी मोदींना दिली आहे. 45 जागा जिंकून मोदींचे हात बळकट करू, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील ट्विट करुन राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले. सस्नेह स्वागत ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४