शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांवर कारवाई का होत नाही?, राज ठाकरेंचा मनपा आयुक्तांना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 11:53 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्या भेटीसाठी कल्याण डोंबिवली माहापालिकेत दाखल झाले आहेत.

कल्याण - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. शहरातील  विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांची कल्याण डोंबिवली महापालिकेत भेट घेतली. कामं होत नसल्याची तक्रार मनसे नगरसेवकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे केडीएमसीच्या आयुक्तांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष पारकर, राजू पाटील, राजेश कदम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे, नगरसेविका कस्तुरी देसाई, तृप्ती भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. 

शहरातील विविध मुद्यांवरुन यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना फैलावर धरले.  फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक परिणामकारकपणे होण्यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घातले पाहीजे. केवळ खालील अधिकाऱ्यांवर ती जबाबदारी सोपवून फेरीवाले हटणार नाहीत, असं सांगत ही शहरं आपल्याला साफ हवीत की नको? शहर स्वच्छ कधी करणार?, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना विचारला. तसेच कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई का होत नाही, असा सवालही यावेळी त्यांनी आयुक्तांना विचारला. फेरीवाल्यांना जास्तीत जास्त दंड आकाराल्यास त्यांचे वारंवार बसणे कमी होईल. रेल्वेने रेल्वेच्या हद्दीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार महापालिकेनं महापालिकेच्या हद्दीत कारवाई करावी,अशी मागणीही यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांकडे केली. सोबत, रेल्वेची हद्द आणि पालिकेची हद्द एकदाच निश्चित करण्याचीही मागणीही राज यांनी केली.

मनसे नगरसेवकांच्या मागण्या- महापालिकेने डोंबिवलीतील बालभवनातील पै फ्रेंण्डस लायब्ररीला चालवण्यास द्यावी.

- कला क्रीडा विभाग बंद केला आहे, तो सुरु करावा.

- सकाळच्या वेळेत डोंबिवली पूर्व व पश्चिमेतून बसेस जास्त प्रमाणात सोडव्यात. त्याचबरोबर खंबाळपाडा बस डेपो सुरू करण्यात यावा.

- 27 गावे महापालिकेत आल्यावर त्यांच्या हद्दवाढी पोटी सरकारकडून निधी मिळवून विकास कामे करण्यात यावीत.

- मोहने परिसरातील बंद असलेले शौचालय तातडीने सुरु करण्यात यावे. 

- आरक्षित भुखंडावरील अतिक्रमण हटवून फेरीवाल्यांसाठी असलेल्या आरक्षित जागेवर फेरीवाल्यांना बसवावे

दरम्या,  यासंदर्भात लवकर निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही आयुक्त पी वेलारासू यांनी राज ठाकरे यांना दिली आहे. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे