राज ठाकरे यांच्या मुलीला अपघात
By Admin | Updated: November 3, 2014 04:38 IST2014-11-03T04:38:09+5:302014-11-03T04:38:09+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे यांचा शनिवारी मध्यरात्री महालक्ष्मी जंक्शन येथे अपघात झाला. भरधाव असलेली स्कूटी घसरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

राज ठाकरे यांच्या मुलीला अपघात
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे यांचा शनिवारी मध्यरात्री महालक्ष्मी जंक्शन येथे अपघात झाला. भरधाव असलेली स्कूटी घसरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.
महालक्ष्मी येथे राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीकडे उर्वशी ठाकरे (२0) शनिवारी अभ्यासासाठी गेली होती. मध्यरात्री १२च्या सुमारास उर्वशी मैत्रिणीसोबत रपेट मारण्यासाठी गेली. दोघी स्कूटीवरून जात असतानाच भरधाव स्कूटी घसरली आणि उर्वशी खाली पडली. त्याचवेळी गस्तीवरील दोन पोलिसांनी दोघींना जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी उर्वशीला हिंदुजा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे हिंदुजा रुग्णालयातील अस्थिव्यंग सर्जन डॉ. संजय अग्रवाल यांनी सांगितले. तिला कुठलीही गंभीर दुखापत झाली नसून तिच्या मैत्रिणीला किरकोळ दुखापत झाल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)