राज ठाकरेंविरुद्धचे दोषारोपपत्र रद्द!
By Admin | Updated: October 31, 2015 02:15 IST2015-10-31T02:15:45+5:302015-10-31T02:15:45+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ २०१० मध्ये मराठवाड्यात झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी दाखल झालेली तीन दोषारोपपत्र रद्द करण्याचे

राज ठाकरेंविरुद्धचे दोषारोपपत्र रद्द!
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ २०१० मध्ये मराठवाड्यात झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी दाखल झालेली तीन दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी दिले आहेत.
रत्नागिरी येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात राज ठाकरे यांना प्रक्षोभक भाषण केल्याच्या पार्श्वभूमीवर २१ आॅक्टोबर २०१० रोजी पहाटे तीन वाजता अटक करून वांद्रे (मुंबई) न्यायालयात नेण्यात आले. तेथे त्यांना जामीन मिळाला.
दुसऱ्या दिवशी डोंबिवली ठाण्यातील गुन्ह्याच्या अनुषंगाने कल्याण (ठाणे) न्यायालयाच्या वॉरंटनुसार अटक करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ राज्यभर मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. बीड जिल्ह्यात दोन ठिकाणी, तर जालना येथे एका ठिकाणी बसवर दगडफेक झाली होती. जालना व माजलगाव (बीड) येथे एकूण तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर राज यांच्यासह संबंधित कार्यकर्त्यांच्या विरोधात बीड व जालना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.