शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचे लक्ष महाराष्ट्र ! पुण्यासह मराठवाड्याचा दौरा करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 13:37 IST

केवळ एक आमदार असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्ष संघटनेसह लोकांच्या मनातल्या जागेवरही नवनिर्माण करावं लागणार आहे.

ठळक मुद्देमराठवाड्याचा करणार दौरा तर पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावाऔरंगबाद,जालना, परभणी, बीडला करणार दौरा 

पुणे : केवळ एक आमदार असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्ष संघटनेसह लोकांच्या मनातल्या जागेवरही नवनिर्माण करावं लागणार आहे. ही गोष्ट राज ठाकरे यांनी चांगलीच मनावर घेतली असून येत्या आठवड्यात ते पुण्यासह मराठवाड्याचा दौराही करणार आहेत. 

       पुणे, मुंबई आणि नाशिकचा टप्पा ओलांडत ठाकरे यांनी आता उर्वरित महाराष्ट्रात फिरण्यास सुरुवात केली आहे. आगामी २०१९च्या लोकसभा आणि विधानसभेची पावलं ओळखत त्यांनी सुरु केलेली ही वाटचाल त्यांना कितपत उपयोगी ठरेल सांगणं कठीण असलं तर सुरुवात केल्याची नोंद मात्र घ्यायला हवी. ठाकरे आज पुण्यात असणार असून उद्या ते महाराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यात सुरुवातीला ते औरंगाबादला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तिथून पुढे जालना,परभणी, बीडलाही त्यांचा दौरा असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना मदतही केली जाईल. या सगळ्यात त्यांना आळसावलेल्या आणि काहीशा ढेपाळलेल्या कार्यकर्त्यांना जागं करता येणार आहे. मागील काही दिवसांपासून पक्ष संघटनेतही बदल करण्यात आले असून जून्यांची नाराजी दूर करणेही सुरु आहे. ठाकरे स्वतःही ऍक्टिव्ह झाले असून व्यंगचित्राच्या माध्यमातून आणि विविध प्रश्नांवर प्रतिक्रिया देत अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. 

    पुण्याला मागच्याच आठवड्यात उद्धव ठाकरेंनी भेट दिली.अमित शहादेखील नुकतेच येऊन गेले आहेत . त्यानंतर येत्या शुक्रवारी गणेश कला क्रीडा मनसेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी शहरावर चांगलेच लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. पक्षाकडून आगामी लोकसभा लढवण्यासाठी उमेदवाराचा शोध सुरु असल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले आहे. मराठवाड्यातही मनसेची स्थिती फारशी चांगली नसून ठाकरे यांनी स्वतः लक्ष देण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत होती.अखेर ठाकरे यांनी पक्षाला ठराविक भागापुरते सीमित न ठेवता राज्यात पोचवण्याचे मनावर घेतल्याचे दिसत असून याचा कितपत उपयोग  होईल याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळेल. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण