मनसे काढणार 'मराठा', राज ठाकरे होणार संपादक

By Admin | Updated: February 18, 2015 11:50 IST2015-02-18T11:22:20+5:302015-02-18T11:50:52+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता आपल्या पक्षाचे मुखपत्र काढणार असून 'मराठा' नावाने हे मुखपत्र प्रकाशित होणार असल्याचे वृत्त आहे.

Raj Thackeray will be the editor of 'Maratha' | मनसे काढणार 'मराठा', राज ठाकरे होणार संपादक

मनसे काढणार 'मराठा', राज ठाकरे होणार संपादक

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १८ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता आपल्या पक्षाचे मुखपत्र काढणार असून 'मराठा' नावाने हे मुखपत्र प्रकाशित होणार असल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे स्वतः या मुखपत्राचे संपादक होणार असून राज ठाकरेंच्या या नव्या इनिंगकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःवर होणा-या टीकेचे उत्तर देण्यासाठी मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक आणि सामना हे वृत्तपत्र सुरु केले होते. बाळासाहेबांचे सडेतोड विचार शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यात या दोन्ही माध्यमांनी मोलाची भूमिका बजावली होती. बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे हेदेखील पक्षाचे मुखपत्र काढणार आहेत. 'मराठा' हे आचार्य अत्रे यांनी सुरु केलेले अग्रगण्य दैनिक होते.संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आचार्य अत्रेंनी मराठामधून घणाघात केला होता.  पण आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर हे दैनिकही बंद पडले. राज ठाकरेंनी आचार्य अत्रे यांच्या कन्येकडून 'मराठा' नावाचे कायदेशीर हक्क मिळवत याच नावाने दैनिक काढण्याची तयारी सुरु केली आहे. मराठा हे मनसेचे मुखपत्र असेल असे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मराठा सुरु होईल अशी चर्चा आहे. मराठा सुरु झाल्यास शिवसेनेच्या सामनासमोर नवे आव्हान उभे राहणार आहे. महापालिका निवडणुकीत मराठा विरुद्ध सामना असा नवा संघर्षही पाहायला मिळू शकतो. 

Web Title: Raj Thackeray will be the editor of 'Maratha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.