शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'सुपारीबाज ते घासलेट चोर', मनसे-राष्ट्रवादीत जुंपली; मनसैनिकांनी मिटकरींची गाडीच फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 15:18 IST

अमोल मिटकरींची अकोल्यात मनसैनिकांनी गाडी फोडली.

Raj Thackeray Vs Ajit Pawar : 'अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली आहेत', अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) चे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर सुपारीबहाद्दर असल्याचा पलटवार केला होता. त्या टीकेनंतर आज मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 

अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोडअकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रम झाले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात  आली आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा संगर्ष टळला. दरम्यान, या घटनेनंतर आता मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

हल्ल्यानंतर मिटकरींची प्रतिक्रियाया घटनेनंतर अमोल मिटकरींनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, 'अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अशा हल्लांना आम्ही भीक घालत नाही. ते नपूसंक आहेत, असे मागून हल्ले करुन काही होणार नाही. ही गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही. मी याप्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. असं करुन महायुतीत सत्तेत येऊ शकतो, असं त्यांना वाटत असेल, तर तसं कधीही होणार नाही,' असं मिटकरी म्हणाले.

मनसे नेत्याकडून मिटकरींचा 'घासलेट चोर' उल्लेखअमोल मिटकरींच्या टीकेनंतर मनसे नेते गजानन काळे यांनी मिटकरी आणि अजित पवारांवर पलटवार केला. '70 हजार कोटीचा घोटाळा करुन नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी(हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत). तरी घासलेट चोर वर तोंड करुन आम्हाला सुपारीबाज बोलतोय... अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राजसाहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर ...??? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी…!!! मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू ... उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका... पक्ष चोरून पण 1 खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची (ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले) टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला ...आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत !!!' अशी घणाघाती टीका काळे यांनी केली.

नेमका वाद काय?राज ठाकरे यांनी सोमवारी(दि.29) पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांवर बोचरी टीका केली होती. पुण्यातील पावसाचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणं भरली आहेत. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा थेट सुपारीबाज असा उल्लेख केला. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये.  हे सुपारी बहाद्दर टोल नाका, भोंगा किंवा आणखी कुठल्याही आंदोलनाला यशस्वी झाले नाही. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे, अशी टीका मिटकरींनी केली होती. त्या टीकेनंतर मनसैनिक खुप नाराज झाले होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAmol Mitkariअमोल मिटकरीAkolaअकोलाMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस