शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार: काय आहे मनसेचा विदर्भातील मास्टर प्लॅन? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 15:10 IST

गणेशोत्सवानंतर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पाऊल उचलली आहेत.

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकीकडे शिवसेनेला गळती लागली आहे तर मनसेनेही याच संधीचा फायदा घेत राज्यभरात पक्ष संघटना वाढीवर भर दिला आहे. अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने समोर आणला आहे. शिवसेनेने भाजपाला धक्का देत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात नवी आघाडी जन्माला आली. त्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मविआ सरकारमध्ये शिवसेनेची कोंडी होऊ लागली. 

शिवसेनेची ही परिस्थिती पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा आणि अजेंडा दोन्ही बदलले. बाळासाहेब ठाकरे जयंतीच्यादिवशी मनसेने आक्रमक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेवर कुरघोडी केली. राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेने त्यांच्याकडील १ मत विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने दिले होते. मध्यंतरी राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पुन्हा राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. 

गणेशोत्सवानंतर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पाऊल उचलली आहेत. त्यात राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, नाशिक प्रमाणेच आता विदर्भातही पक्षवाढीवर भर दिला आहे. विदर्भात शिवसेनेचा मतदार हा सहजासहजी भाजपाला मतदान करणार नाही. या परिस्थितीत शिवसेनेवर नाराज असलेल्या मतदाराला मनसेकडे वळवण्याचा राज ठाकरेंना प्रयत्न आहे. विदर्भात एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद कमी करण्यात भाजपाला यश आले आहे. आता राज ठाकरे हे १३ सप्टेंबरला नागपूर जिल्हा दौऱ्यावर जाणार असून याठिकाणी ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे.

राज्यात भाजपा-मनसे युतीचं नवीन समीकरण? गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेत्यांची मनसे प्रमुख राज ठाकरेंशी जवळीक वाढली आहे. सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते. त्यापूर्वीही फडणवीसांनी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यात भाजपा-मनसे युतीचं नवीन समीकरण पाहायला मिळणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेShiv Senaशिवसेना