शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray, Shiv Sena Symbol: शिवसेना चिन्हाबद्दलच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची मनसैनिकांना 'वॉर्निंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 20:46 IST

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला संदेश

Raj Thackeray reaction Shiv Sena Symbol: उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या द्वंद्वामध्ये शनिवारी दोन्ही गटांना धक्का बसला. खरी शिवसेना कोणाची... ठाकरेंची की शिंदेंची? याचा फैसला निवडणूक आयोगाकडे होणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागले आहे. तशातच, अंधेरीची विधानसभा पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला होणार असून त्यासाठी १० तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव कोण वापरणार यावर अनेकविध चर्चांना उधाण आले होते. तशातच, शनिवारी निवडणूक आयोगाने हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवले. तसेच शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. या निर्णयानंतर नेतेमंडळींकडून विविध प्रतिक्रिया येत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना वॉर्निंग दिली आहे.

शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नव्या चिन्हासाठी आणि नव्या नावासाठी उद्या दुपारी १ वाजेपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. याचदरम्यान, राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहिली असून त्यात मनसैनिकांना तंबी दिली आहे. "सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन," असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी लिहिले आहे.

दरम्यान, उद्या दुपारी १ वाजेपर्यंत शिंदे आणि ठाकरे गटांना आपले नवे चिन्ह आणि नवे नाव निवडणूक आयोगाला द्यायचे आहे. ठाकरे गटाकडून तीन चिन्हे आणि तीन नावे असा पर्याय आयोगाला देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी नावांचे आणि निवडणूक चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत. पक्षाच्या चिन्हासाठी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाकडून देण्यात आले आहेत. तर, पक्षाच्या नावांसाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. यापैकी एक नाव आणि एक चिन्ह लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावे जेणेकरून आम्हाला जनतेच्या दरबारात जाता येईल, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे