शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray Speech MNS Meeting : मनसेचे पदाधिकारी सुस्त पडलेत, मी ते पत्र त्यासाठीच दिलेले...; राज ठाकरेंनी बैठकीत सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:49 IST

Raj Thackeray in Mumbai: राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते. 

गेल्या काही वर्षांत माझ्या जवळच्या लोकांनी जी काही वाट लावलीय, त्यामुळे हिप रिप्लेसमेंटची सर्जरी केली. गेल्या वर्षी हाड पंक्चर करून इंजेक्शन दिले होते. परंतू वर्षभराने पुन्हा दुखणे बळावले. डॉक्टर म्हणाले की पहिल्या चार-पाच महिन्यात त्रास दिसतो, वर्षभराने नाही. मी उद्या पुण्याला जाऊन येणार आहे. एका दिवसासाठी. बैठका वगैरे लावू नका. मला त्रास होत नाहीय, पण एकदा तपासून पहायचे आहे. नाशिकलाही देवीच्या दर्शनाला जायचे आहे, असे राज ठाकरेंनीमनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन केले. 

राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते. खोटा प्रचार केला जातोय. तुम्ही सक्षम आहात, तुम्हाला कान आहेत, मेंदू आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण जी काही उत्तरे द्यावी लागतात ती थांबवा. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे, मनसे आंदोलने अर्धवट सोडतात. एक आंदोलन दाखवा. टोल आंदोलन आम्ही ६०-६५ टोलनाके बंद पाडले. शिवसेना-भाजपाच्या अजेंड्यात होते, त्यांना हे विचारायला जात नाहीत, सगळ्या जिल्ह्यांत टोल नाके सुरु आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. 

टोल नाक्यांद्वारे पैसे गोळा करतात, त्यातून निवडणुकीत केलेला खर्च काढला जातो. हे टोलनाके किती दिवस सुरु राहणार आहेत हा आपला पहिला प्रश्न होता. त्यात रोखीने पैसे येतात ते कुठे जातात याचे उत्तर आम्हाला अद्याप सरकारने दिलेले नाही. आमच्या हातात सत्ता द्या, मी बंद करून दाखवतो, असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले. टोलनाकेवाले या लोकांना पैसा पुरवितात, असा आरोपही राज ठाकरेंनी केला. भोंग्यांचे आंदोलन जे केले त्यावर पोलिसांनी म्हटलेय ९३ टक्के भोंगे बंद झालेत. जे सुरु आहेत ते कमी आवाजात अधिकृत सुरु आहेत. मी ते पत्र तुमच्या हातात दिले, मी ते सोशल मीडियावर टाकू शकलो असतो. पण तुमचा आणि लोकांचा कनेक्ट किती आहे ते मला पहायचे होते. अनेक मनसैनिकांनी मला सांगितले की आम्हाला ते पत्र मिळाले नाही नाहीतर आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवले होते. थंड पडलेत. निवडणुकीचे वारे सुरु आहेत, त्यांच्या मनात. हे जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगले नाहीय. मतदारांना कळत नसेल की कोणाला मतदान केले. हे राजकारण नाही, तर तात्पुरती आर्थिक अॅडजस्टमेंट आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.  

मनोहर जोशी होते...मी बाळासाहेबांना बाहेर पडतोय म्हणून सांगायला गेलो, तेव्हा तिथे मनोहर जोशी होते. ते खोलीच्या बाहेर गेले. बाळासाहेबांनी हात पसरले, मला मीठी मारली आणि मला म्हणाले जा. त्यांना समजले होते. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आम्ही जेवढी आंदोलने केलीत, तेवढी कुणीच केली नाहीत आणि यशस्वीही केली नाहीत. माझे भाषण सुरु असताना ठाण्यात खळ्ळकण आवाज आला. त्यानंतर मोबाईल कंपन्यांची पत्रे आली. एका आठवड्याची वेळ दिली, त्यानंतर महाराष्ट्रात मराठीत आवाज ऐकू येऊ लागला, असेही राज ठाकरे म्हणाले.  

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे