राज ठाकरे नरमले, युतीला तयार

By Admin | Updated: January 10, 2017 14:55 IST2017-01-10T14:32:43+5:302017-01-10T14:55:18+5:30

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाचा प्रस्ताव आल्यास युतीबाबत विचार करणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Raj Thackeray softened, prepared in the alliance | राज ठाकरे नरमले, युतीला तयार

राज ठाकरे नरमले, युतीला तयार

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाचा प्रस्ताव आल्यास युतीबाबत विचार करणार असल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. फेब्रुवारीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने मनसेशी युती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र युती झाली नव्हती.
 
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. मात्र राज ठाकरे नेमकं कोणत्या पक्षासोबत युती करण्यासाठी इच्छुक आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. यासाठी अनेक दिग्गजांनी प्रयत्नदेखिल केले होते. 

Web Title: Raj Thackeray softened, prepared in the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.