शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray vs Uddhav Thackeray: "हे लोक ढोंगी, बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून पदरात पाडून घेता येईल तेवढं घ्यायचं"; राज ठाकरेंची उद्धव यांच्यावर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 20:12 IST

"हे आधी आजारी होते, मंत्रालयातही जात नव्हते पण आता शिवसेना भवनात जातात"

Raj Thackeray vs Uddhav Thackeray: सध्या राज्यात एक विचित्र असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सध्या शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आहे. पण या सरकारचे भवितव्य कोर्टात ठरवलं जाणार आहे. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस चारही पक्ष सध्या या प्रकरणात समाविष्ट आहेत. पण या साऱ्यापासून दूर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र वेळोवेळी रोखठोक भूमिका घेतली आहे. आजही त्यांच्या भूमिकेकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अतिशय जहरी टीका केली.

"बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली. प्रखर हिंदूत्व म्हणजे काय ते बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलं पाहिजे. बाळासाहेबांचा हा विचार कोण जिवंत ठेवतंय हे आता लोकांनी पाहावं. पण हे लोक ढोंगी आहेत. बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून घेतात आणि पदरात पाडून घेता येईल तेवढं घ्यायचं.  नंतर फटका बसला की एवढंसं तोंड करून बसायचं. हे आधी आजारी होते, मंत्रालयातही जात नव्हते पण आता मात्र शिवसेना भवनात जातात. मला कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात किंवा कुणाच्या कुटुंबात जायचं नाही. पण हा विचार झालाच पाहिजे", अशा शब्दांत झीचोवीसतासच्या मुलाखतीत त्यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

राज ठाकरे यांनी या मुलाखतीत इतरही अनेक विषयांवर आपली मतं मांडली. मुंबई महापालिकेत जर मनसेची सत्ता आली तर आम्ही याआधीही कधीही लोकांनी जे पाहिलं नसेल असा विकास करून दाखवू. तो विकास नक्की कसा करायचा हे मात्र मी माझ्या जाहीरनाम्यातून स्पष्ट करेन, असं राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्यामुळेच शिवसेनेचा खिंडार पडले. त्यांनी योग्य पद्धतीने गोष्टी पुढे नेल्या नाहीत, असा मुद्दा त्यांनी मांडला. मीडियावरही त्यांनी टीका केली. कोणी तरी एखादा पत्रकार अमित ठाकरेंच्या बद्दल काहीतरी स्वत: लिहितो आणि त्यावर प्रतिक्रिया द्यायला लावतो. मग तेच पुढे चालवलं जातं. याचं कारण २४ तास बातम्या चालवण्यासाठी तुम्हाला जो कोळसा लागतो तो तुम्ही असा निर्माण करता, असा खोचक टोलाही राज यांनी लगावला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना