शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:12 IST

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर; कोण कुठल्या शाळेत शिकले याची यादीच वाचून दाखवली...

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील दोन बडे नेते आणि चुलत भाऊ तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आले. वरळीच्या विजयी मेळाव्यात मराठी मुद्द्यावरून राज आणि उद्धव यांनी एकत्रित आपले विचार मांडले. मराठी भाषेची सक्ती असायलाच हवी पण हिंदीची सक्ती कराल तर मराठी माणूस पेटून उठेल आणि तुम्हाला पळवून लावेल, असा संदेश ठाकरे बंधूंनी दिला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ठाकरेंची मुले इंग्रजी माध्यमातून शिकली या सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला राज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच, कोण कुठल्या शाळेत शिकले याची यादीच वाचून दाखवली. 

"बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियममध्ये शिकले. लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले... हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? अडवाणी हे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत. दक्षिण भारतात तमिळ किंवा तेलगू च्या प्रश्नावर लोक कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. त्यांना कोणीही विचारत नाही की तुम्ही कुठे शिकलात किंवा तुमची मुले कुठे शिकली. मी हिब्रू भाषेत शिकेन पण मराठी भाषेच्या कडवटपणा बाळगेन, त्याला काय तक्रार असू शकते?" असा रोखठोक सवाल राज ठाकरेंनी विचारला.

त्यानंतर राज यांनी थेट यादीच वाचून दाखवली. "दक्षिण भारतातील इंग्रजीतून शिकलेले नेते आणि अभिनेते यांची यादी पाहा. जय ललिता दोमेंदो इंग्रजी मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लॉयला, कनिमोझी प्रेझेंटेशन कॉन्वेंट स्कूल, करूणानिधींचा नातू उदयनिधी डॉन बॉस्को, चंद्राबाबू नायडू इंग्रजीचे शिक्षक होते व शिक्षणही त्याच मिडियममधून झाले. पवन कल्याण शिक्षण सेंट अँनमधून झालं. चंद्रबाबूंचा मुलगा नारा लोकेश स्टँडफर्ड स्कूल, कमल हसन सँनफम हायस्कूल, अभिनेता विक्रम मॉडफर्ड स्कूल, एआर रहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास ख्रिश्चनरी हायस्कूल..." असे म्हणत राज ठाकरे यांनी संपूर्ण यादी वाचून दाखवत महायुती सरकारला गप्प केलं. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीUddhav Thackerayउद्धव ठाकरेenglishइंग्रजीmarathiमराठी