शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंकडून वसंतदादांच्या आठवणींना उजाळा, जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचीही विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 13:18 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगलीत दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास अभिवादन केले. यावेळी त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दलही त्यांनी विचारपूस केली. 

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगलीत दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास अभिवादन केले. यावेळी त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दलही त्यांनी विचारपूस केली. औदुंबर येथील साहित्य संमेलनाकरीता राज ठाकरे शनिवारी रात्रीच सांगलीत आले होते. रविवारी सकाळी वसंतदादांच्या स्मारकाचे दर्शन घेण्याची इच्छा त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. याबाबतची कल्पना त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनाही दिली होती. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता ठाकरे आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत कृष्णा नदीकाठच्या स्मारकाच्या ठिकाणी आले. त्याठिकाणी प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. दादांच्या समाधीस्थळास त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी प्रतीक पाटील यांच्याशी संवाद साधला. दादांची एक आठवण सांगताना ठाकरे म्हणाले की, पहिल्यांदा दादांना मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेटलो तो प्रसंग अजूनही आठवतो. दादांनी आत बोलावल्यानंतर ते लुंगी आणि बनियनवर बसले होते. ते कॉटवर बसल्यानंतर त्यांनी मला बसण्याची विनंती केली. इतका साधेपणा दादांनी जपला होता. दादांच्या भेटीबद्दल मी जो विचार केला होता त्या विचारापलिकडे दादांचा साधेपणा मला दिसला. खरेच ती व्यक्ती ग्रेट होती, असे ते म्हणाले. त्यानंतर प्रतीक पाटील यांनीही दादांच्या आठवणी ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. यावेळी ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर, माजी आमदार नितीन शिंदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, अ‍ॅड. स्वाती शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : ठाकरेजन्मशताब्दी वर्षाचे कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल आणि स्टेशन चौकातील स्मारकाच्या उर्वरीत निधीबाबत शासन उदासिन असल्याची माहिती अ‍ॅड. स्वाती शिंदे यांनी ठाकरे यांना दिली. याबाबत प्रतीक पाटील यांच्याशी ठाकरे यांनी चर्चा केली. दादांच्या स्मारकाच्या निधीचा प्रश्न आणि जन्मशताब्दी वर्षातील कार्यक्रमांबाबत मी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेल, असे आश्वासन यावेळी ठाकरे यांनी दिले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSangliसांगली