शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी, म्हणाले डीएसके चिटर नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 14:13 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत.  

ठळक मुद्देमनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत.  डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत.  डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा, असं आवाहन राज ठाकरेंनी गुंतवणूकदारांना केलं आहे.  डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांपैकी काही गुंतवणूकदारांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यात बैठक झाली.

 ‘आज काही राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित अमराठी लोक त्यांना उध्वस्त करु पहात आहेत. तसं होऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहीजे’.अडचणीत असलेल्या डीएसकेंच्या पाठी उभं राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत,असं राज ठाकरे म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांमधे डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णींवर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असून आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे. पुणे सत्र न्यायालयाने डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर,  मुंबई उच्च न्यायालयाने तीनवेळा डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनाला मुदतवाढ दिली.

डीएसकेंना कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी डीएसकेंच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या 30 तारखेला डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डीएसकेंच्या पाठीशी राज ठाकरे उभे राहिले आहेत. डीएसकेंच्या साडे आठ हजार हजार गुंतवणूकदारांपैकी सातशे ते आठशे गुंतवणूकदार राज ठाकरेंसोबतच्या या बैठकीला उपस्थित होते.

 

विजय मल्ल्याप्रमाणे पळून नाही जाणार,आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार

गेले वर्षभर आर्थिक अडचणीमुळे अनेकांचे पैसे परत करु शकलो नाही़ आता त्यातून बाहेर पडत आहे. उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत कसे करणार याचा आराखडा देणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार सगळ्यांचे पैसे परत करणार आहोत. विजय मल्ल्याप्रमाणे कोठेही पळून जाणार नाही, असे बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके)यांनी म्हंटलं होतं. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी