शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेची तयारी ; राज ठाकरे पवारांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 15:06 IST

सुमारे पाऊण तास चालेल्या या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. दुसरीकडे, भेटीगाठी आणि फोडाफोडीच्या राजकरणामुळे राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच , लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सुमारे पाऊण तास चालेल्या या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या  तयारीला लागले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

निवडणुकीतल्या पराभवानंतर मंगळवारी महाआघाडीची मंथन बैठक झाली. यावेळी राज ठाकरेंबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चा झाली. यावेळी, मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या आघाडीत घेण्यावरून सुद्धा चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राज यांनी पवारांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा झाली असून राज्यातील राजकीय परिस्थिती बाबत सुद्धा चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. तेव्हापासूनर शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. त्यानंतर, निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यातच, कालच्या आघडीच्या मंथन बैठकीत राज यांना सोबत घेण्याची चर्चा झाली.त्यामुळे विधानसभा निवडणूकीत मनसेला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भाजप-शिवसेना युतीला सामोरं जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे.