शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वेळीच सुधरा अन्यथा पुढच्या मोर्च्यात खळखट्याक, राज ठाकरेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 15:51 IST

रेल्वेसारख्या सरकारी यंत्रणांनी वेळीच कामात सुधारणा करावी अन्यथा पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई - भारतीय रेल्वेसारख्या सरकारी यंत्रणांनी आपल्या कामात सुधारणा केली नाही, तर पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेची गाडी पुन्हा खळखट्याकचा मार्ग अवलंबेल असा सूचक इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका करताना राज ठाकरे यांनी तुम्ही सगळ्या भारतीय जनतेचा विश्वासघात केला आहेत, तुमच्याइतका खोटारडा पंतप्रधान मी बघितला नाही असा आरोप केला.

पश्चिम व मध्य अशा दोन्ही रेल्वे स्थानकांच्या भवताल असलेल्या फेरीवाल्यांचा दाखला देत 15 दिवसांच्या आत जर हे फेरीवाले हटवले गेले नाहीत तर ते काम माझ्या पक्षाचे कार्यकर्ते करतील असे राज म्हणाले. एलफिन्स्टन पुलावर 29 सप्टेंबर रोजी 23 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संताप मोर्चाचे आयोजन दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ राज ठाकरे यांनी केले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

- इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीत. आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती तीच आजच्या सरकारमध्ये. त्यामुळे हा संताप आहे.    ज्याच्यावर कधी विश्वास टाकला नाही त्यांनी घात केला तर वाईट वाटत नाही. पण ज्यावर विश्वास टाकला तेच घात करतायत. म्हणून माझा मोदींवर राग आहे. या देशाने इतकं प्रेम दिलं, विश्वास टाकला त्यांच्यासाठी काय करताय? 

- भाषणादरम्यान राज ठाकरेंची नितीन गडकरीवरही टीका, अच्छे दिन म्हणजे गळ्यात अडकलेले हाडूकचा दिला संदर्भ. याचा अर्थ अच्छे दिन येणार नाहीत हे निश्चित असा आरोप.

- सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणूनच त्यांचं खात बदललं. त्यांच्या जागी पियुष गोयलांना आणला. या गोयलांना काय कळतं रेल्वेचं. या गोयलांच्या पियूषपेक्षा आमच्या दादरच्या आस्वाद, प्रकाशचा पियूष बरा. 

- मुठभरांसाठी बुलेट ट्रेन आणणार, त्यांच्यासाठी लाख कोटीचे कर्ज काढणार आणि अख्खा देश हे कर्ज फेडत बसणार, हे चालणार नाही.

- मुंबईतल्या मूठभर व गुजरातमधल्या मुठभर गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेनचा डाव असून हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे. 

- माझा व्यक्ती म्हणून मोदींना विरोध नाही....पण त्यांच्या भूमिकांना विरोध आहे, आधी वेगळे बोलत होते आता मोदींची भाषा बदलली आहे. तुमच्याशी आमचं घेणदेण नाही. तुमच्या चुकीच्या भूमिकांना विरोध.

- यावेळी मेट्रो परीसरातील वीज गेली, यावेळी ते म्हणाले की, वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच. 

- बुलेट ट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले- सुरेश प्रभूंनी बुलेटट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढून टाकलं. फक्त २-३ माणसं देश चालवणार का?- सर्व संपादकांना माझी विनंती आहे की या सरकारला वठणीवर आणा- न्यायालयांसह सर्व संविधानिक संस्थांना माझी विनंती आहे की दबावाखाली निर्णय घेऊ नका- देशातल्या घराघराचा कानोसा घ्या या; लोकं सरकारला शिव्या घालताहेत- देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत

- रतन टाटांच्या सांगण्यावरून मी गुजरातेत गेलो, परंतु आता कळतंय तो मुखवटा होता. खरा विकास झालेला नाही.

- भाजपामधले लोकपण हा सगळा खोटा मुखवटा असल्याचं खासगीत सांगतात.

- आजचा मोर्चा शांततेत निघाला, परंतु पुढचा मोर्चा शांततेत नसेल.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेElphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीMumbai Localमुंबई लोकलMNSमनसेBullet Trainबुलेट ट्रेनMNS Santap Morchaमनसे संताप मोर्चा