शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज ठाकरे करणार फेसबुक पेज लॉन्च; मुंबईत पार पडणार कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 09:38 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरूवारी त्यांचं फेसबुक पेज लॉन्च करणार आहेत.

ठळक मुद्देमनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरूवारी त्यांचं फेसबुक पेज लॉन्च करणार आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजच्या प्रमोशनसाठी खास टिझरही तयार करण्यात आलं आहे.व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर” असं टीझरच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

मुंबई, दि. 21- मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरूवारी त्यांचं फेसबुक पेज लॉन्च करणार आहेत. त्यासाठी सगळी तयारी झाली असून मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज राज ठाकरे स्वत: हे पेज लाँच करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजच्या प्रमोशनसाठी खास टिझरही तयार करण्यात आलं आहे. व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर” असं टीझरच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा टिझर लॉन्च करण्यात आला आहे.

२१ सप्टेंबरला मोठा कार्यक्रम आयोजित करुन राज ठाकरे फेसबुक पेज लाँच करणार आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसलेले राज ठाकरे याच पेजचा वापर प्रचारासाठी, स्वत:ची मतं मांडण्यासाठी, सरकारवर टीका करण्यासाठी वापरणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मागील निवडणुकांमधील सततच्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षाची मोट बांधायला सुरुवात केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून या फेसबुक पेजचा वापर केला जाणार आहे. गेल्या काही वर्षात सोशल मीडिया हे प्रचार, प्रसाराचं महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून पुढे येत आहे. निवडणुकीच्या वेळीही सोशल मीडियाचा पुरेपुर वापर केला जातो. देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती तसंच राजकीय नेत्यांवर खुलेपणाने टीका करताना आपण सगळ्यांनीच राज ठाकरेंना पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या या फेसबुक पेजवर नेमकं काय पाहायला मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

थेट मेलद्वारे संपर्क करण्याचे राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहनआपसातील गट - तट खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करुन सूचना करु शकता, असं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं होतं. ठाण्यासह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मनसेला पराभवाची झळ बसल्यानंतर संघटनेत काही बदल करण्याच्या दृष्टीने त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. 

देशात अप्रत्यक्ष आणीबाणी, राज ठाकरेंनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणादेशात सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी लागू झाल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी यांनीही असाच प्रयत्न केला, तेव्हा जनसंघाने त्याला विरोध केला होता. आता बहुधा भाजपाला इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य वाटत असावी, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राजकीय फायद्यांसाठी चुकीचे पायंडे पाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाFacebookफेसबुक