शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray Interview: तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; 'दादू' उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरे थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 20:15 IST

Raj Thackeray on Uddhav Thackeray's trust: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 

शिवसेनेत उद्धव ठाकरेंविरोधात बंड करणाऱ्या शिंदे गटावर जर वेळ आलीच तर मी त्यांना मनसेत विलिन करण्यावर विचार करेन, असे वक्तव्य करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 

Raj Thackeray Interview: गरज पडली तर शिंदे गट मनसेत विलिन करण्यावर विचार करेन; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिले स्पष्ट संकेत

Raj Thackeray Interview: शिवसेना फुटण्याचं फुकट श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचे - राज ठाकरे

मी शिवसेनेत बंड केले नाही. मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. मी कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, यामुळे माझी तुलना बंडखोरांशी करू नये, असे राज ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे माझे जुने सहकारी आहेत. मी माध्यमांतून त्यांचा गट मनसेत विलिन होईल असे ऐकले. या तांत्रिक बाबी आहेत. जर शिंदेंना गरज पडली तर आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर मी त्या ४० आमदारांना मनसेत विलिन करण्याबाबत विचार करेन, असे राज ठाकरे म्हणाले. झी २४ तासने राज यांनी ब्लॅक अँड व्हाईट मुलाखत घेतली.

Raj Thackeray: ही राजेशाही नाहीय! राज ठाकरेंनी जिभेला आवर घालावा; अयोध्येवरून योगींच्या मंत्र्याचा इशारावजा सल्ला

यावेळी भाजपासोबत युती करणार का? असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी जर तर मध्ये जाण्यात अर्थ नाही. मी तो विचार करत नाहीय. युतीचा विचार करून पक्ष  बांधायला घेतला तर बांधला जाणार नाही. या आयत्यावेळी येणाऱ्या गोष्टी आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. मी भाजपाची स्तुती केली की त्यांच्यासोबत, शरद पवारांशी बोललो की युती करतात की काय अशा चर्चा केल्या जातात, असे राज ठाकरे म्हणाले.

यानंतर उद्धव ठाकरेंना २०१४ मध्ये युतीसाठी दोनदा टाळी दिल्याच्या गोष्टींवर राज ठाकरेंना विचारले असता धक्कादायक वक्तव्य राज ठाकरेंनी केले. तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे. विश्वास ठेवण्यासारखा नाही. बाकीच्या लोकांचे वाईट वाटते. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहीत नाही, तेवढा मला माहीत आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबाबत आपले मत व्यक्त केले. बाळासाहेबांनी फोन केला, दादू इस्पितळात आहे यावर छे़डले असता राज यांनी तो भावनेचा विषय होता, आजारपणाचा होता, असे स्पष्ट केले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना