शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मोदी विरोधकांच्या एकीने राज ठाकरे खूश, काय म्हणाले बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 14:34 IST

कर्नाटकात मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात दिलेल्या एकीबद्दल राज ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं आहे. या सगळ्याचा गिअर मीच टाकला होता, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

नाणारः कर्नाटकात मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात दिलेल्या एकीबद्दल राज ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं आहे. या सगळ्याचा गिअर मीच टाकला होता, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी नाणार प्रकल्पग्रस्तांनीही त्यांची भेट घेतली. तसेच नाणार प्रकल्पग्रस्तांनी राज ठाकरेंकडे स्वतःची कैफियत मांडली.नाणार प्रकल्पग्रस्तांना आंदोलन करण्याबरोबरच सभा, बैठका घेता येऊ नयेत, यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने मनाई आदेश लागू केले जात आहे. आमचा आवाज दडपण्याचा डाव प्रशासनाचा असल्याचा आरोप नाणार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची रितसर चौकशी करावी, अशी मागणी या प्रकल्पग्रस्तांनी राज ठाकरे यांच्याकडे केली.गुरुवारी राजापुरात आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाणार प्रकल्पग्रस्तांनी महामार्गावरील गुरुमाऊली हॉटेलच्या सभागृहात भेट घेतली व प्रशासनाकडून कशा प्रकारे दडपशाही सुरू आहे, त्याचा पाढा वाचला. आमच्या जमिनी हडपल्या जात आहेत, प्रकल्प लादण्यात आला आहे. त्याविरुद्ध बोलायचे नाही व प्रकल्पाच्याविरोधात सभा, बैठका घेता येऊ नयेत म्हणून जमावबंदी आदेश लागू करायचा, असे प्रकार गेले वर्षभर सुरू असल्याने आम्हाला तुमच्याकडे यावे लागल्याची भावना प्रकल्पग्रस्तांचे नेते नंदू कुलकर्णी यांनी व्यक्त केली.यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता येथे हा विषय नको. पुढे काय करायचे ते बघतो, असे उत्तर दिले. यावेळी काही प्रकल्पग्रस्तांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवरदेखील निशाणा साधला. शिवसेनेकडून प्रकल्पाला विरोध असल्याचे दाखवले जाते, पण सहकार्य दिले जात नाही, अशीही टीका करण्यात आली. त्यावर मनसे अध्यक्षांनी ‘असे असतानाही तुम्ही त्यांनाच मते देता ना’, अशा शब्दात प्रकल्पग्रस्तांना हळूच चिमटाही काढला.भूमी कन्या एकता मंच मोर्चाला पाठिंबानाणार प्रकल्पाविरोधात दिनांक ३० मे रोजी काढण्यात येणाऱ्या भूमी कन्या एकता मंचच्या मोर्चाला आपला पाठिंबा असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मंचाच्यावतीने राज ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल निश्चित घेतली जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरीKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८