शेतीविषयी फार ज्ञान पाजळत नाही, पण बळीराजानं मनसेच्या पाठीशी राहावं- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 05:17 PM2020-02-01T17:17:56+5:302020-02-01T17:19:13+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लातूरला आले होते. लातुरात आल्यानंतर त्यांनी मनसैनिकांनी भरवलेल्या कृषी प्रदर्शनाला उपस्थिती दर्शवली आहे.

Raj Thackeray does not have much knowledge about agriculture, but the victim should stay with MNS. | शेतीविषयी फार ज्ञान पाजळत नाही, पण बळीराजानं मनसेच्या पाठीशी राहावं- राज ठाकरे

शेतीविषयी फार ज्ञान पाजळत नाही, पण बळीराजानं मनसेच्या पाठीशी राहावं- राज ठाकरे

Next

लातूरः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लातूरला आले होते. लातुरात आल्यानंतर त्यांनी मनसैनिकांनी भरवलेल्या कृषी प्रदर्शनाला उपस्थिती दर्शवली आहे. त्यानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना त्यांनी संबोधित केलं आहे. अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन भरवल्यामुळे मी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. महाराष्ट्रात प्रयोगशील शेतकरी आहे.

जो फक्त महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणातच आपल्याला सापडतो. महाराष्ट्रातल्या माझ्या प्रयोगशील शेतकऱ्याला या सगळ्या प्रदर्शनाचा नक्कीच उपयोग आणि फायदा होईल. समोर शेतकरी असल्यानं शेतीविषयी मी ज्ञान पाजळू शकत नाही. शेतकऱ्यांनी मनसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. 

मी आज थोडासा भ्रमनिराश तुमचा करणार आहे. सर्दी, खोकला झाला अन् माझी तब्येत ढासळली, मुंबईसारख्या भागात थोडीशी लागणच आहे. तब्येत खराब असल्यानं बोलताना मला त्रास होतो. भारतात जे काही घुसखोर आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी 9 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मोर्चासाठी मी सर्वांना आमंत्रित करतो. तुम्ही तिथे येणे गरजेचं आहे. ते तुमचं कर्तव्य आहे. तिथे भाषण करावं लागणार असल्यानं घसा ढणढणीत बरा करण्यासाठी जर वेळ लागेल. मी एक तारखेला येऊ शकलो नाही, 9 तारखेला मोर्चा झाल्यानंतर पहिला दौरा मराठवाड्यात आहे. मराठवाड्यात आल्यानंतर सगळ्यांना भेटेन आणि बोलेन, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

Web Title: Raj Thackeray does not have much knowledge about agriculture, but the victim should stay with MNS.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.