राज ठाकरेंनी ओवेसींचं चित्र असलेला केक कापून साजरा केला वाढदिवस
By Admin | Updated: June 14, 2016 17:46 IST2016-06-14T13:11:19+5:302016-06-14T17:46:07+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी असदुद्दिन ओवेसी यांचे चित्र असलेला केक कापून आज वाढदिवस साजरा केला. राज ठाकरे यांचा आज 48 वा वाढदिवस आहे

राज ठाकरेंनी ओवेसींचं चित्र असलेला केक कापून साजरा केला वाढदिवस
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी असदुद्दिन ओवेसी यांचे चित्र असलेला केक कापून आज वाढदिवस साजरा केला. राज ठाकरे यांचा आज 48 वा वाढदिवस आहे. त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमणावर गर्दी केली आहे.
कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनीच आणलेला केक कापून राज यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. मात्र, जो केक कार्यकर्त्यांनी आणला होता, त्यावर ओवेसींचे छायाचित्र होते. राज यांनी त्यावर सुरी चालवत वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसासारख्या गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी व राज ठाकरे यांनी निवडलेला मार्ग तुम्हाला योग्य वाटतो का? की ही हीन अभिरूची आहे असं तुम्हाला वाटतं?
याआधी राज्याचे माजी महाधिवक्ते आणि वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्रातून विदर्भाचा तुकडा कापला होता. त्यावरुन राज ठाकरेंनी श्रीहरी अणेंवर जोरदार टीकाही केली होती. या संदर्भात बोलताना एमआयएमचे भायखळयाचे आमदार वारिस पठाण यांनी असल्या किरकोळ गोष्टींना आम्ही महत्व देत नसल्याचे सांगितले. राज ठाकरे हे संपलेलं प्रकरण आहे असेही ते म्हणाले.
तुमचं मत प्रतिक्रिया रुपानं जरूर नोंदवा...