राज ठाकरेंना अटक करा, रिपाइं खरात गटाची मागणी
By Admin | Updated: July 27, 2016 23:27 IST2016-07-27T23:27:53+5:302016-07-27T23:27:53+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने बुधवारी राज्यभर निदर्शने केली.
राज ठाकरेंना अटक करा, रिपाइं खरात गटाची मागणी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचे वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने बुधवारी राज्यभर निदर्शने केली. शिवाय राज ठाकरे यांना अटक केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष सचिन खरात म्हणाले की, राजकीय पुनर्वसनासाठी धडपणारे राज ठाकरे भडक बोलून प्रसिद्धी झोतात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. काडीचाही अभ्यास नसलेल्या ठाकरे यांच्या वक्तव्याने राज्य घटनेचाच विरोध केलेला आहे. त्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त करताना सरकारने त्यांना अटक करण्याची मागणी केलेली आहे.