शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:41 IST

Raj Thackeray On MNS Morcha: पहिली इयत्तेपासून राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकविण्याच्या राज्य सरकारच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.

MNS Protest: पहिली इयत्तेपासून राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकविण्याच्या राज्य सरकारच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी केली आहे. 

या मोर्चाला कोणताही झेंडा नसणार आहे. फक्त मराठी हाच या मोर्चाचा अजेंडा असणार आहे, असे राज म्हणाले. तसेच राज यांनी या हिंदी सक्तीविरोधात सर्व राजकीय पक्षांनी या सामील व्हावे असे आवाहन केले आहे. राज्यातील प्रत्येक मराठी माणसाने मोर्चात सामील व्हावे असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

हिंदी किंवा इतर भाषेची सक्ती मी होऊ देणार नाही. जे शिक्षण तज्ञ, भाषा तज्ञांनी बोलणार आहे, त्यांना माझे पत्र जाईल. सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आम्ही बोलविणार आहोत. सरकारला जनतेच्या मनात काय आहे समजायला हवे. रविवार अशासाठी निवडला कारण विद्यार्थी पालकांना यायला जमणार आहे. हा कट आहे त्याविरोधात सर्व मराठी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. 

मनसेकडून जाहीर झालेले असले तरी या मोर्चाचे नेतृत्त्व कोणताही पक्ष नाहीय, तर मराठी माणूस करणार असल्याचेही राज यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर राज ठाकरे यांनी  मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचे आहे, असा गर्भित इशाराही दिला आहे. राज ठाकरे यांचा हा इशारा कोणासाठी आहे याची चर्चा आता रंगणार आहे.

इशारा कोणाला...

राज यांनी राजकीय पक्ष, कलावंतांना हा इशारा दिल्याचे समजते आहे.  अनेक राजकीय पक्षांनी हिंदी सक्तीवरून सरकारवर टीका केली आहे. त्या पक्षांचे प्रमुख नेते या मोर्चामध्ये येणार का, हे पाहावं लागेल. तसंच, काही कलाकारांनी यावर चकार काढलेला नाही. ते काय भूमिका घेतात, हेही ६ जुलैला समजेल. 

शिक्षणतज्ञांची भूमिका काय...

१७ जूनचा 'अनिवार्य' शब्द वगळून सुधारित निर्णय शासनाने केला आहे. या निर्णयात 'रोगापेक्षा इलाज भयंकर' अशा प्रकारचा मजकूर आहे. सुधारित निर्णयात पहिलीपासून तिसरी भाषा लादण्याचा शासनाचा इरादा पक्का असल्याचे प्रतीत होते, अशी खरमरीत टीका डॉ. दीपक पवार (मराठी अभ्यास केंद्र), शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे (ग्राममंगल), चिन्मयी सुमित (मराठी शाळांच्या सदिच्छादूत), गिरीश सामंत (शिक्षण अभ्यासक), भाषा अभ्यासक प्रकाश परब, लेखक कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी (महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी), कौतिकराव पाटील (मराठवाडा साहित्य परिषद), किशोर दरक, आदी शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेhindiहिंदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSchoolशाळाmarathiमराठीMorchaमोर्चा