‘मेट्रो-७ चे खांब उभारा’

By Admin | Updated: February 19, 2017 01:32 IST2017-02-19T01:32:33+5:302017-02-19T01:32:33+5:30

पावसाळ्यापूर्वी मेट्रो-७ मार्गाच्या बांधकामासह पायलिंग, पायलिंग कॅप्स आणि मेट्रोचे खांब उभारण्यासाठी संपूर्ण तयारी करण्याचे निर्देश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे

'Raise the pillars of Metro 7' | ‘मेट्रो-७ चे खांब उभारा’

‘मेट्रो-७ चे खांब उभारा’

मुंबई : पावसाळ्यापूर्वी मेट्रो-७ मार्गाच्या बांधकामासह पायलिंग, पायलिंग कॅप्स आणि मेट्रोचे खांब उभारण्यासाठी संपूर्ण तयारी करण्याचे निर्देश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिले.
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो मार्ग-७ ची पाहणी प्रवीण दराडे यांनी प्रकल्प संचालक, मुख्य अभियंता आणि सल्लागारांसह शनिवारी केली. या वेळी ते बोलत होते.
दराडे यांनी या वेळी प्रकल्पाच्या तीनही टप्प्यांवरील कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
मेट्रो-७ च्या बांधकामासाठी आवश्यक पायलिंग रिग्स आणि कुशल कामगारांची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
वाहतूक सुरळीत राहण्यासाठी
या सर्व कामांचे नियोजन करणे अतिशय निकडीचे असल्याचे दराडे यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Raise the pillars of Metro 7'