'रईस'ला कोल्हापुरात 'क्षत्रिय'चा विरोध, सिनेमागृह बंद
By Admin | Updated: January 25, 2017 14:21 IST2017-01-25T13:42:30+5:302017-01-25T14:21:31+5:30
अभिनेता शाहरूख खानचा बहुचर्चित रईस चित्रपट आज प्रदर्शित झाला असला तरी या चित्रपटाच्या मागचं शुक्लकाष्ठ अद्याप संपलेलं नाही.

'रईस'ला कोल्हापुरात 'क्षत्रिय'चा विरोध, सिनेमागृह बंद
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 25 - अभिनेता शाहरूख खानचा बहुचर्चित रईस चित्रपट आज प्रदर्शित झाला असला तरी या चित्रपटाच्या मागचं शुक्लकाष्ठ अद्याप संपलेलं नाही. पाकिस्तानी कलाकार माहिरा खान शाहरूखसोबत या चित्रपटात झळकणार असून याच मुद्यावरून कोल्हापूरात चित्रपटाचा विरोध सुरु आहे.
शाहरुख पाकिस्तानच्या बाजूने विधाने करतो. पाकिस्तानला आर्थिक मदत करतो. पाकिस्तानी खेळाडूंना सिनेमांमध्ये स्थान देतो. असा आरोप करत क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनने सिनेमाला विरोध केला आहे.
क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनच्या वतीने कोल्हापुरात गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी चित्रपट पाहायला येणाऱ्यांना झेंडूची फुले देत शाहरुख खानचा सिनेमा न पाहण्याचं आवाहन करत निषेध नोंदवला आहे. या आंदोलनानंतर कोल्हापूरातील पद्मा चित्रपटगृहाने रईसचे सकाळचे दोन शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.