रायपूरच्या सराफा व्यापाऱ्यास लुटले

By Admin | Updated: August 24, 2015 00:48 IST2015-08-24T00:48:55+5:302015-08-24T00:48:55+5:30

कुंभमेळा स्पेशल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या मनोहरदास आसाराम सोनी (४८, कर्नल नगर, रायपूर, छत्तीसगढ) या व्यापाऱ्यास तीन तरुणांनी

Raipur bullion traders looted | रायपूरच्या सराफा व्यापाऱ्यास लुटले

रायपूरच्या सराफा व्यापाऱ्यास लुटले

भुसावळ (जि. जळगाव) : कुंभमेळा स्पेशल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या मनोहरदास आसाराम सोनी (४८, कर्नल नगर, रायपूर, छत्तीसगढ) या व्यापाऱ्यास तीन तरुणांनी धक्काबुक्की करीत सव्वातीन लाखांचे दागिने लंपास केले. जळगाव-भुसावळदरम्यान ही घटना शनिवारी रात्री पाऊण वाजताच्या सुमारास घडली. जळगाव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर पाच मिनिटांनी ही
घटना घडली़ वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे़
मनोहरदास सोनी हे शनिवारी रात्री कुंभमेळा एक्सप्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून जळगाव-भुसावळदरम्यान प्रवास करीत होते़ त्याचवेळी २३ ते २५ वयोगटातील तीन जणांनी या व्यापाऱ्याला धक्काबुक्की करीत त्याच्याकडील कापडी पिशवीतील दागिने असलेला डबा लांबविला. डबा ताब्यात मिळताच चोरटे पसार झाले. भुसावळ लोहमार्ग पोलिसांत भादंवि ३५६, ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Raipur bullion traders looted