कोकण रेल्वेवर आजपासून ‘पावसाळी वेळापत्रक’
By Admin | Updated: June 10, 2017 03:10 IST2017-06-10T03:10:39+5:302017-06-10T03:10:39+5:30
कोकण रेल्वेमार्गावरील एक्स्प्रेस शनिवारपासून पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहेत. कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे

कोकण रेल्वेवर आजपासून ‘पावसाळी वेळापत्रक’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील एक्स्प्रेस शनिवारपासून पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहेत. कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. १० जून ते ३० सप्टेंबरपर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार आहे.
ट्रेन क्रमांक १०११२ मडगाव-छत्रपती शिवाजी टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायं. ६.१५ऐवजी सायं. ७.३६ वाजता सुटेल. (११००४) दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायं. ५.३०ऐवजी ६.५० वाजता सुटेल. (१०१०४) मांडवी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून स. १०.०६ऐवजी १०.४५ वाजता सुटेल. (५०१०६) दिवा-पॅसेंजर ही सावंतवाडी येथून सकाळी ८.३० वाजता सुटेल.
ट्रेन क्रमांक (१२०५२) मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस ही कुडाळ येथून दु. १.५४ ऐवजी दु. ३.४८ वाजता सुटेल. (१२६२०) मेंगलोर-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही रात्री ११.५६ऐवजी रात्री ८.४१ वाजता सुटेल. (१२१३४) मेंगलोर-छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस ही कणकवली येथून रात्री ११.५६ऐवजी रात्री ८.४१ वाजता सुटणार आहे.
(१६३४६) नेत्रावती एक्स्प्रेस ही कुडाळ येथून स. ८ऐवजी स. ७.०६ वाजता सुटेल. (२२४१३) राजधानी एक्स्प्रेस ही कुडाळ येथून दु. १२.४२ऐवजी दु. ११.३० वाजता सुटणार आहे. (११०८६)डबलडेकर ही सावंतवाडी येथून स. ७ऐवजी स. ७.२२ वाजता सुटणार आहे. ट्रेन क्रमांक (२२१२०) तेजस एक्स्प्रेस ही मंगळवार, गुरुवार, रविवार सावंतवाडी येथून स. ९.०८ऐवजी दु. ३.२८ वाजतातर (२२१४९) एर्नाकुलम एक्स्प्रेस सावंतवाडीतून रात्री ८.२० ऐवजी रात्री ६.२६ वाजता सुटेल. (१२१३४) मेंगलोर-छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस ही कणकवली येथून रात्री ११.५६ऐवजी रात्री ८.४१ वाजता सुटणार आहे.