पावसाने दाणादाण
By Admin | Updated: May 8, 2014 11:57 IST2014-05-08T11:57:50+5:302014-05-08T11:57:50+5:30
शंभर कुटुंबे बेघर झाडे घरांवर कोसळली

पावसाने दाणादाण
ढेबेवाडी, मसूर, उंब्रजला वादळी वार्याचा तडाखा सातारा : कºहाड आणि पाटण तालुक्यांच्या काही भागात आज (बुधवार) वादळी पावसाने कहर केला. ढेबवाडी विभाग, उंब्रज आणि मसूर परिसरात जवळपास शंभरहून अधिक घरांवरील पत्रे वार्याने उडून गेले. उंब्रज, कवठे, मसूर आणि ढेबेवाडी परिसराला वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. कºहाड तालुक्यात हेळगावसह गोसावेवाडी, बेलवाडी, कचरेवाडी, कवठे, चिंचणी येथे अनेक घरांवरील छपर उडून गेले. गोसावेवाडी येथील एकजण गंभीर जखमी झाला. कवठे येथील अनेक घरांचे नुकसान झाले. हेळगाव येथे आंबा बागांचे नुकसान झाले. कचरेवाडी येथे एका ट्रॅक्टरवर वडाचे झाड कोसळले. उंब्रज परिसरालाही जोरदार तडाखा बसला. चरेगाव परिसरात ६० हून अधिक घरांचे पत्र उडून गेले. नायब तहसीलदार बी. एम. गायवाड, मंडल अधिकारी अनिल घनवट यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ पंचनामे केले. (प्रतिनिधी)