ठाणे जिल्ह्यात पावसाचा कहर

By Admin | Updated: July 31, 2014 04:44 IST2014-07-31T04:44:15+5:302014-07-31T04:44:15+5:30

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. उल्हास नदीसह शाई, काळू, वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे़

Rainfall in Thane district | ठाणे जिल्ह्यात पावसाचा कहर

ठाणे जिल्ह्यात पावसाचा कहर

ठाणे : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. उल्हास नदीसह शाई, काळू, वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे़
उल्हास, काळू नद्यांच्या पुराचे पाणी कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, म्हारळ, टिटवाळा आदी नागरी वस्त्यांमध्ये घुसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. याशिवाय भातसा, शाई, काळू, पिंजाळ, वैतरणा, सूर्या आदी नद्यांना पूर आल्यामुळे ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे १३५ हून अधिक गावांचा शहरांशी संपर्क
तुटला आहे. जिल्ह्यातील बहुतेक भागांतील शेती पाण्याखाली
गेली आहे़
नाशिक महामार्गावर कसारा-इगतपुरीदरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे आणि महामार्गावर चारहून अधिक तास वाहतूककोंडी झाली.

Web Title: Rainfall in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.